मुंबईकर काळजी घ्या ! मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढली; रुग्ण दुपटीचा दरही होतोय कमी

मिलिंद तांबे
Saturday, 20 February 2021

मुंबईत 57 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 321 इतकी आहे. 

मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णवाढ सुरूच असून काल दिवसभरात 823 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यांउळे मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 3 लाख 17 हजार 310 झाली आहे. कालच्या दिवसात 440कोविड रुग्ण बरे झाले. त्यामुळे आतापर्यंत 2 लाख 98 हजार 435 रूग्ण बरे होऊन घरी गेले.

कोरोना रुग्णसंख्या एकीकडे वाढतेय मात्र मुंबईतील कोरोना मृत्युदर मात्र अद्याप नियंत्रणात असून काल दिवसभरात केवळ 5 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा 11 हजार 435 इतका झाला आहे.

महत्त्वाची बातमी : कोरोनाच्या विळख्यात अडकले राज्याचे मंत्री; दोन दिवसात 'हे' चार मंत्री झाले पॉझिटीव्ह

मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर हा 94 टक्के इतका झाला आहे. तर रुग्ण दुपटीचा दर 393 दिवसांवर गेला आहे. कोविड रुग्णवाढीचा दर 0.18 इतका आहे. आतापर्यंत पर्यंत एकूण 30 लाख 98 हजार 894 कोविड चाचण्या करण्यात आल्या.

मुंबईत काल मृत झालेल्या रुग्णांपैकी 4 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्या व्यक्तींपैकी 4 पुरुष तर 1 महिला होती. मृतांपैकी सर्व रुग्णांचे वय  60 वर्षांवर होते.

महत्त्वाची बातमी : गळती आणि चोरी रोखण्याचे आव्हान ! गेल्या पाच वर्षात महावितरणची थकबाकी किती वाढली? वाचा

मुंबईत 57 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 321 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 4,523 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. काल कोविड केअर सेंटर 1 मध्ये 398 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले.

corona patient graph increasing in mumbai 823 new patients dtected from mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona patient graph increasing in mumbai 823 new patients detected from Mumbai