मुंबई इज दी बेस्ट...कोरोना रूग्णांना मिळताहेत न्यूयॉर्क पेक्षा दर्जेदार सुविधा

मुंबई इज दी बेस्ट...कोरोना रूग्णांना मिळताहेत न्यूयॉर्क पेक्षा दर्जेदार सुविधा

मुंबईः 'चेस दी पेशंट' पॉलिसीच्या अंतर्गत सर्व विभाग कार्यालयांमध्ये वॉर रूम स्थापन करण्यात आले. त्या माध्यमातून कोरोना रूग्णांसाठी बेड मँनेजमेट केले जाते. पॉझिटीव्ह रूग्णांसाठी 24 तासांत रिपोर्ट आणि बेड उपलब्ध करण्यात येत असल्याचे सांगून अशा सुविधा जगातील सर्वात श्रीमंत आणि मॉडर्न असलेल्या न्यूयॉर्क पालिकेत देखील नसल्याचा दावा पालिका आयुक्त आय एस चहल यांनी केला आहे.

कोरोना रूग्णांना बेड आणि आरोग्य सेवा वेळेत मिळाव्यात यासाठी पालिकेने वैशिष्ट्यपूर्ण अशी चेस दी पेशंट पॉलिसी सुरू केली आहे. या पॉलिसीच्या माध्यमातून आरोग्य व्यवस्थेचं विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. त्यासाठी पालिकेने 24 वॉर्ड मध्ये वॉर रूम सुरू केलेत. या वॉर रूमच्या मदतीने त्या त्या परिसरातील रूग्णांना चाचणी अहवाल आणि बेडची व्यवस्था करण्यात येते.

या पॉलिसीच्या माध्यमातून पालिका कर्मचारी स्वःता रूग्णाच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतात. त्याला बेड मिळवून देतात इतकेच नाही तर त्या अॅम्ब्यूलन्समध्ये घेऊन रूग्णालयात नेत असल्याची माहिती आयुक्त चहल यांनी दिली. बाधित रूग्णाला आपल्या घरातून बाहेर पडण्याची आवश्यकता नाही शिवाय त्यांना बेडसाठी किंवा रूग्णालयासाठी कुणालाही फोन करायची देखील आवश्यकता नसल्याचंही चहल पुढे म्हणाले.

हेही वाचाः 'सत्ता गेल्यानं विरोधकांची डोकी कामातून गेली', शिवसेनेची भाजपवर घणाघाती टीका
 
न्यूयॉर्क शहर हे जगातील सर्वात श्रीमंत शहर असल्याचे मानले जाते. मात्र तिथे देखील मुंबईच्या धर्तीवर कोरोना रूगांसाठी सुविधा दिल्या जात नसल्याचा दावा आयुक्त चहल यांनी केला आहे. दिवसभरात  संशयित रूग्णाची चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल रात्री १२च्या आत एपिडेमिक सेलकडे पाठवला जातो. त्यानंतर विभागवार यादी करून तो अहवाल सकाळी 7,30 पर्यंत त्या त्या विभाग कार्यालयांना पाठवला जातो. त्यानंतर विभाग कार्यालयांतून पॉझिटिव्ह रूग्णासोबत संवाद साधला जात असल्याची माहीती आयुक्त चहल यांनी दिली.

रूग्णाला त्याच्या लक्षणांनुसार उपचार दिले जातात. रूग्णाच्या संपर्कात आलेल्या अति जोखमीच्या व्यक्तींना सीसीसी1 सेंटरमध्ये क्वांरटाईन केले जाते. या व्यक्तींना पालिका स्वतः बसने सेंचरमध्ये घेऊन जाते.सौम्य लक्षणे असणा-या रूग्णांना घरी योग्य सुविधा असल्यास होम क्वांरटाईन केले जाते अन्यथा अशा व्यक्तींना सीसीसी2 मध्ये दाखल केले जाते. तर अधिक तीव्र लक्षणे असणा-या रूग्णांना ऑक्सिजनची व्यवस्था असणा-या डीसीएचसी सेंटरमध्ये दाखल केले जाते. तीव्र लक्षणे,इतर व्याधी किंवा श्वसनाचा त्रास असणा-या रूग्णांना डीसीएच रूग्णालयात दाखल केले जाते. येथे त्यांच्यासाठी आवश्यक आसणा-या आयसियू, व्हेंटिलेटर,ऑक्सिजन या सुविधा दिल्या जातात अशी माहिती ही चहल यांनी दिली.

पालिकेने प्रत्येक विभागात 10 एँम्ब्युल्ंस,10 मेडीकल टीमची निर्मीती करण्यात आली आहे. बेडची माहिती सर्वांना मिळावी यासाठी डँश बोर्डची।सुविधा सुरू करण्यात आली आहे. रूग्णांच्या गरजेनुसार रूग्णालयांचा प्राधान्यक्रम ठरवून देण्यात आला आहे. त्यामुळे गरजू रूग्णाला एका क्लिकवर सर्व माहिती उपलब्ध होत आहे. यामुळे रूग्णांची फरफट थांबली असल्याचा दावा ही आयुक्त चहल यांनी केला आहे.

कोरोना संसर्गाची सद्यस्थिती

*न्यूयॉर्क -

एकूण रूग्ण 2,30,410

मृत्यू - 23,012

दैनंदिन रूग्णवाढ - 5,500-6,000


*मुंबई

एकूण रूग्ण -1,16,451

मृत्यू - 6,444

दैनंदिन रूग्णवाढ - 800 - 12,00

संपादनः पूजा विचारे

Corona patients get better facilities than New York municipality claims

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com