मुंबई कोरोनाच्या विळख्यात; सात दिवसांत सात पटीने रुग्ण वाढ!

मुंबईचा पाॅझिटिव्हीटी दर 4 टक्क्यांवर
Corona Patient
Corona PatientSakal media

मुंबई : मुंबईत एकूण राज्याच्या तुलनेत सर्वाधिक रुग्ण (corona patients increases) वाढले आहेत. राज्यातही चिंताजनक स्थिती निर्माण झाली असून गेल्या सात दिवसात सात पटीने रुग्ण वाढले आहे. तर, दोन दिवसांत रुग्ण दुप्पट होत असून मुुंबईचा पाॅझिटिव्हीटी दर (Mumbai corona positivity rate) 4 टक्क्यांवर गेला आहे. ही आकडेवारी मुंबईसाठी धोक्याचा अलार्म (risk for Mumbai) असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh tope) यांनी सांगितले. (corona patients increases speedily in Mumbai as its an alert warning for Mumbai)

Corona Patient
"राज्यपाल-सरकारमध्ये सुसंवाद नाही; कोश्यारींना केंद्रानं परत बोलवावं"

ओमिक्राॅन रुग्ण स्थिती परिणामकारक दिसून येत नसली तरीही आणि राज्यात तिसरी लाट आल्यास तिला परतवण्याची आरोग्य विभागाची तयारी असली तरी देखील राज्यात चिंताजनक स्थिती निर्माण झाली असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. राज्यात 20 जानेवारी दरम्यान 5 ते 6 हजार एवढी कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या होती. मात्र, सात महिन्यानंतर पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली.  28 डिसेंबर रोजी सक्रिय रुग्णांची संख्या 11 हजार 492 एवढी नोंदली गेली. तर, बुधवारी रात्रीपर्यंत ही संख्या 20 हजारांवर पोहोचेल अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.

मुंबईत 20 जानेवारी दरम्यान 300  च्या आत सक्रिय रुग्ण संख्या होती. मात्र,  डिसेंबर महिन्याच्या सात दिवसांमध्येही रुग्ण संख्या वाढून 1300 वर पोहोचली आहे. तर,या संख्येत आणखी भर पडून 2 हजारांचा टप्पा आज पार होईल. त्यामुळे, गेल्या सात दिवसात सात पटीने रुग्ण वाढले आहेत. रुग्ण दुपटीचा कालावधीही कमी झाला असून दिवसांत रुग्ण दुप्पट होत आहेत. याआधी मुंबईत दररोज चारशे ते सहाशे रुग्णांची नोंद केली जायची. आता मात्र दोन हजाराच्या वर पाॅझिटिव्ह प्रकरणे असू शकतील असा अंदाज आहे.

Corona Patient
"राज्यपाल-सरकारमध्ये सुसंवाद नाही; कोश्यारींना केंद्रानं परत बोलवावं"

दिवसाला 51 हजार चाचण्या

मुंबईत रोज 51 हजार चाचण्या केल्या जात आहेत. यातून 2200 कोरोना पाॅझिटिव्ह आल्यास 4 टक्के एवढा पाॅझिटिव्हीटी दर पकडला जात आहे. हा दर चिंतनीय आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज वाढली आहे. 

दुसऱ्या डोससाठी पुढाकार

केंद्राकडून पुरवलेल्या डोसचा वापर योग्य प्रकारे केला जावा यासाठी प्रयत्न राहणार आहे. लस वाया घालवणे म्हणजे राष्ट्रीय नुकसान असून महाराष्ट्र तसे होऊ देणार नाही. त्यामुळे डोस न घेतलेल्या लोकांची यादी करण्यात आली आहे. गाव पातळीवर आशा वर्कर आणि कम्यूनिटी हेल्थ वर्कर अधिकाऱ्यांना डाॅक्टरांना ही यादी देण्यात आली आहे. घरोघरी जाऊन समुपदेशन करुन ही लस देण्यात यावी, लस लवकर घेण्यास सुचवण्यात येत असल्याचे टोपे म्हणाले. तसेच दुसरा डोस शिल्लक राहिलेल्यांची यादी देखील तयार असून त्यांना फोन, मेसेजव्दारे लस देण्यात येत आहे. याला गती देणे आवश्यक आहे.

"संपर्क टाळावेत, इतरांना संसर्ग होणार नाही यासाठी मास्क वापरणे, सोशल डिस्टसिंग, आणि सॅनिटायझर ही त्रिसूत्री वापरावी. जगभरात ही त्रिसूत्री अजूनही वापरली जात आहे."

- राजेश टोपे, आरोग्यमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com