दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह; महापालिका सतर्क | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Omicron Virus

दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह; महापालिका सतर्क

डोंबिवली: दक्षिण आफ्रिकेचा केपटाऊन शहरातून आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याची आरोग्य विभागाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. या रुग्णाचे नमुने मुंबई येथे जीनोम सिक्वेन्सिंग साठी पाठवले जाणार असून त्याला ओमायक्रोन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झाली आहे का? हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे. सध्या या रुग्णाला महापालिकेच्या विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर या रुग्णाच्या भावाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून त्याच्या कुटुंबाची तपासणी उद्या केली जाणार असल्याचे महापालिकेच्या विभागाच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले आहे.

हेही वाचा: 'भाईजान'ची बिग बॉस मराठीच्या चावडीवर एंट्री

दक्षिण आफ्रेकेच्या नव्या विषाणूमुळे सध्या जरभरात चिंतेचं वातावरण आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले होते. त्यानंतर कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असतानाच आता ओमिक्रॉन हा नवा व्हेरिएंट आला आहे. व्हायरसमध्ये म्युटेशन झाल्यामुळे विषाणू आणखी घातक झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. यावेळी ICMRच्या अधिकाऱ्यांनी महत्वाची माहिती दिली आहे. प्रयोगशाळा आणि लोसंख्येवर आधारित निरीक्षणांवर अभ्यास सुरू असल्याची माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे. तसेच या विषाणूची अतिरिक्त माहिती आणि त्याची वर्तणूक तपासून निष्कर्ष काढला जाईल, असं त्यांनी सांगितलं.

Web Title: Corona Positive A Traveler From South Africa To Dombivli Omicron Variant Corona

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..