esakal | पॉझिटीव्हीटी रेट घसरला; तरीही मुंबई लेव्हल तीनमध्येच
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai corona

पॉझिटीव्हीटी रेट घसरला; तरीही मुंबई लेव्हल तीनमध्येच

sakal_logo
By
रामनाथ दवणे

मुंबई : शहरात दोन दिवसांपूर्वी मृत्यूचे प्रमाण १० टक्क्यांच्या खाली गेले होते. पण गेले दोन दिवस यात पुन्हा वाढ होताना दिसत आहे. काल मुंबईत एकूण 22 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. मुंबईत आज 696 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. या नव्या कोरोना रुग्णांसह मुंबईतील आजवरच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 7,15,146 वर पोहोचली आहे. मुंबईत आज 658 रुग्ण बरे झाले आहेत. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह मुंबईतील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 6,81,946 वर पोहोचली आहे. मुंबईत आज 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृतांसह मुंबईतील आजवरच्या एकूण मृतांची संख्या ही 15,146 वर पोहोचली आहे. सध्या मुंबईतील एकूण ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या ही 15,189 वर पोहोचली आहे.

मुंबईचा आठवड्याचा पॉझिटीव्हिटी रेट साडेपाच टक्क्यांवरुन ४.४०% वर आला आहे. मात्र, तरीही मुंबई लेव्हल तीन मध्येच राहणार आहे. सध्या तरी चालू नियमांमध्ये कोणताही बदल नाही करण्यात आला नाहीये. हा पॉझिटीव्हिटी रेट स्थिर असेल तर नियम बदलण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र, सध्या तरी पॉझिटीव्हीटी दर घसरल्यानंतर देखील मुंबईला लेव्हल तीनचेच निकष लागू असणार आहेत.