रायगड जिल्ह्यात अनेक शिक्षकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह; शिक्षकेतरांची चाचण्या अपूर्ण

सुनिल पाटकर
Thursday, 26 November 2020

रायगड जिल्ह्यामध्ये नववी ते बारावीच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्याचे आदेश सरकारने दिले असले तरीही या शाळांमध्ये शिकवणारे शिक्षक तसेच शाळातील शिक्षकेतर कर्मचारी यांची कोरोना चाचणी अद्यापही पूर्ण  झालेली नाही.

महाड - रायगड जिल्ह्यामध्ये नववी ते बारावीच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्याचे आदेश सरकारने दिले असले तरीही या शाळांमध्ये शिकवणारे शिक्षक तसेच शाळातील शिक्षकेतर कर्मचारी यांची कोरोना चाचणी अद्यापही पूर्ण  झालेली नाही. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत झालेल्या कोरोना चाचणीमध्ये 26 शिक्षक तर 7 शिक्षकेतर कर्मचारी  पॉझिटिव्ह आढळले आहेत.

हेही वाचा - 'वाढीव वीजबिल भरू नका'; राज ठाकरेंचे जनतेला आवाहन

सोमवारपासून जिल्ह्यातील नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरु करण्याबाबत सरकारने आदेश दिले आहेत. असे असले तरीही रायगड जिल्ह्यामधील 644 शाळांपैकी केवळ दोनशे सहा शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती आढळून आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव व त्यामुळे निर्माण झालेली भीती यामुळे पालक वर्गात अजूनही संम्रमावस्था आहे. सरकारने शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शिक्षकांचा व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात अशा चाचण्या अद्यापही पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे अनेक शिक्षकांना शाळांमध्ये शिकविता येत नाही.

आतापर्यंत केवळ साठ टक्के शिक्षकांच्या कोरोना चाचण्या पूर्ण झाले आहेत .या सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना या विद्यार्थ्यांना शिकवणे शक्य होणार आहे .रायगड जिल्ह्यामध्ये कालपर्यंत 7 हजार 470 शिक्षकांपैकी तीन हजार 692 शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत त्यापैकी सव्वीस जणांच्या रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यापैकी कर्जत तालुक्यात 12 पनवेल तालुक्यातील सहा शिक्षकांचा यात समावेश आहे. जिल्ह्यामध्ये तीन हजार 704 शिक्षकेत्तर कर्मचारी असून यापैकी 1 हजार 528 कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून यातील सात कर्मचारी कोरोना पॉझिटिव आढळलेले आहेत . उर्वरित शिक्षकांच्या तपासण्या सुरू असून त्या लवकरच पूर्ण होतील असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे .

हेही वाचा - नॉन कोविड रुग्णांसाठी रक्ताची हाक, कोविड नियमांतर्गतच होणार रक्तदान

---------------------

9 वी ते 12 वी शाळा - 644
शिक्षक _ 7 हजार 417
तपासणी झालेले -3,692
पॉझिटिव्ह _ 26
कर्मचारी . 3714
तपासणी झालेले _15 28
 पॉझिटिव्ह  - 7

 

महाड तालुक्यातील बहुसंख्य शिक्षकांच्या कोरोना चाचण्या पूर्ण होत आल्या आहेत तालुक्यात काही ठिकाणी या चाचण्या पूर्ण झाल्यामुळे शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत . शाळा सुरक्षितेबाबत काळजी घेत आहेत -

अरूणा यादव,
गट शिक्षणाधिकारी, महाड

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report of many teachers in Raigad district is positive