मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात 'सोशल डिस्टन्सिंग'चा विसर?

Mumbai Metro: कोरोनामुळे लॉकडाउन सातत्याने वाढवणाऱ्या ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात 'सोशल डिस्टन्सिंग'चा विसर?
Summary

Mumbai Metro: कोरोनामुळे लॉकडाउन सातत्याने वाढवणाऱ्या ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे 'ते' फोटो व्हायरल

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), महाविकास आघाडीचे मंत्री बाळासाहेब थोरात, मुंबईचे पालकमंत्री असलम शेख, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), मंत्री नवाब मलिक (Nawab Malik), मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत सोमवारी मुंबई मेट्रोचा एक कार्यक्रम पार पडला. मेट्रोला या मान्यवरांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर मेट्रो 2A आणि Line7 च्या मार्गावरील ट्रायल रनला सुरूवात झाली. या कार्यक्रमात महाविकास आघाडीचे बडे नेते आणि इतर पदाधिकारी यांना कोरोनाबद्दलचे नियम, सोशल डिस्टन्सिंगचा विसर पडल्याचे दिसून आले. त्याबद्दलचे काही व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. (Corona Rules Social Distancing went for a toss at Mumbai Metro Train Run Cm Uddhav Thackeray Ajit Pawar MVA govt Leaders were present)

No-Social-Distancing
No-Social-DistancingSocial-Media

मुंबई मेट्रोच्या ट्रायल रन कार्यक्रमासाठी अनेक बडे नेते उपस्थित होते. यावेळी मेट्रो सुरू करण्यासाठी आधी सर्व नेत्यांना हिरवा झेंडा हाती देण्यात आला. सर्वच नेतेमंडळी आणि पदाधिकारी या ठिकाणी हिरवा झेंडा दाखवण्यासाठी सरसावले. त्यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा काही अंशी या नेत्यांना विसरच पडल्याचे चित्र दिसून आले. या कार्यक्रमाबद्दलचे काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले असून ही बाब काहींना रूचली नसल्याचे चित्र आहे.

No-Social-Distancing-CM-Thackeray
No-Social-Distancing-CM-ThackeraySocial-Media

मेट्रोच्या कार्यक्रमात आपलं मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री म्हणाले, "मी खूप दिवसांनी घराबाहेर पडलो. रस्त्यावरील कारची गर्दी पाहून मी काहीसा हबकलो. मी पुन्हा एकदा सांगतो की निर्बंध उठवण्यात आलेले नाही. त्यामुळे लोकांना नियमांचे पालन करावे. जर तसं झालं नाही, तर पुन्हा कडक निर्बंध लावण्यात येतील." पण अशी भूमिका घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळानेच मेट्रोच्या कार्यक्रमात अशाप्रकारे वर्तणूक केल्यामुळे जनसामान्यांमध्ये सरकार व नेतेमंडळीबद्दल नाराजी दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com