esakal | ठाणे शहरातील कोरोना आटोक्‍यात! संख्या दोन आकड्यात, रिकव्हरी रेट 95 टक्‍क्‍यांवर 
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे शहरातील कोरोना आटोक्‍यात! संख्या दोन आकड्यात, रिकव्हरी रेट 95 टक्‍क्‍यांवर 

गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरातील कोरोना बाधितांची संख्या कमी होत असून, ऐन दिवाळीत ही संख्या दोन आकड्यांवर आली आहे.

ठाणे शहरातील कोरोना आटोक्‍यात! संख्या दोन आकड्यात, रिकव्हरी रेट 95 टक्‍क्‍यांवर 

sakal_logo
By
राजेश मोरे

ठाणे ः गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरातील कोरोना बाधितांची संख्या कमी होत असून, ऐन दिवाळीत ही संख्या दोन आकड्यांवर आली आहे. बाधित होण्याचे प्रमाणही आता 8.39 वर आले असून, रुग्ण बरे होण्याचा दर हा 95 टक्‍क्‍यांवर पोहोचला आहे. दरम्यान कोरोना आटोक्‍यात आला तरीही नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे. 

हेही वाचा - बेशरम ठाकरे सरकारला हजार व्होल्टेजचा झटका देण्याची गरज; वीजबिलप्रकरणी भाजप नेत्याचा घणाघात

गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरामध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा सरासरी 150 इतका आहे. तथापि ऐन दिवाळीच्या काळात गेल्या दोन दिवसांपासून ही संख्या दोन आकड्यात येत आहे. दिवाळीच्या काळात 15 नोव्हेंबरला ही संख्या 77 इतकी होती तर 16 नोव्हेंबरला हा आकडा 95 इतका आला आहे. कोव्हिडची साथ नियंत्रणात असतानाही महापालिका सरासरी साडेपाच ते सहा हजारपर्यंत चाचण्या करीत आहे. शहरात 16 नोव्हेंबरपर्यंत साधारणत: पाच लाख 77 हजार 257 इतक्‍या चाचण्या पालिकेने केल्या आहेत. त्यामुळे योग्यवेळी बाधित व्यक्तींवर उपचार करणे सोयीचे झाले आहे. सध्या शहराचा मृत्यूदरही कमी होत असून तो आता 2.31 इतका झाला आहे. तर कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण हे जवळपास 95 टक्‍क्‍यावर पोहोचले आहे. 

नागरिकांनी अनावश्‍यक घराबाहेर पडू नये. कामासाठी बाहेर पडायचे झाल्यास विना मास्क बाहेर पडू नये. तसेच योग्य अंतर ठेवावे आणि सॅनिटायझरचा वारंवार वापर करावा. 
- डॉ. विपिन शर्मा
महापालिका आयुक्त 

Corona in Thane city the recovery rate is 95 percent 

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )