esakal | BMC : जंबो कोविड केंद्रामध्ये मुलांसाठी क्यूबिकल्स वॉर्ड
sakal

बोलून बातमी शोधा

BMC

BMC : जंबो कोविड केंद्रामध्ये मुलांसाठी क्यूबिकल्स वॉर्ड

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईत (Mumbai) तिसरी लाट येण्याच्या (corona third wave) भीतीमुळे यात जास्त प्रभावित होणाऱ्या मुलांच्या उपचारांसाठी (children treatment) पालिकेने (bmc management) व्यवस्था करायला सुरुवात केली आहे. मोठ्या जंबो कोविड केंद्रांमध्ये (corona Center) क्यूबिकल विभाग (cubical section) तयार केले जात आहेत.  जेणेकरून पालक आणि कोरोना बाधित मुलांना एकत्र उपचार करता येतील. या अंतर्गत 350 पेक्षा जास्त खाटांची व्यवस्था केली जात आहे.

हेही वाचा: सरकारच्या वसुलीखोर धोरणामुळे राज्याची वाटचाल आर्थिक अधोगतीकडे- अतुल भातखळकर

तज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली आहे. या लाटेत मुलांना अधिक धोका असण्याची शक्यता लक्षात घेता पालिका आरोग्य विभागाने आधीच संक्रमित मुलांच्या उपचाराची व्यवस्था करणे सुरू केले आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, मुलांवर उपचार करताना अनेकदा अनेक आव्हाने असतात. उपचारादरम्यान पालकांची कमतरता भासू नये म्हणून पालिकेने त्यांच्यासाठी व्यवस्थाही केली आहे. काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीकेसी, नेस्को, मुलुंड यांसारख्या मोठ्या जंबो सेंटरमध्ये तसेच कोविड समर्पित रुग्णालय सेव्हन हिल्स इत्यादींमध्ये क्यूबिकल विभाग सुरू केले जातील.

हा क्यूबिकल वॉर्ड संक्रमित पालक आणि त्यांच्या मुलांसाठी असेल. या क्यूबिकल वॉर्डमध्ये, ते दोघे एकाच डबल बेडवर एकत्र राहतील जेणेकरून त्यांच्यावर एकत्र उपचार करता येतील. कोविड केंद्रांमध्ये अशा पालकांचीही व्यवस्था केली जात आहे ज्यांना संसर्ग झालेला नाही, फक्त त्यांची मुले संक्रमित आहेत. त्यांच्यासाठीही बेडची व्यवस्था केली जाईल जेणेकरून मुले त्यांच्या पालकांना दुरून पाहू शकतील, तसेच पालकांना वेळोवेळी मुलांना भेटण्यासाठी सुरक्षा व्यवस्था देखील केली जाईल. सुरक्षा किटच्या माध्यमातून ते आपल्या मुलांना जवळून पाहू शकतील.

loading image
go to top