esakal | प्रमुख रुग्णालयांवरील कोविडचा भार कमी करणार; मुंबईत मलेरिया-डेंग्यूचे रुग्ण वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

प्रमुख रुग्णालयांवरील कोविडचा भार कमी करणार; मुंबईत मलेरिया-डेंग्यूचे रुग्ण वाढ

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईत कोरोनाची तिसरी लाट (Corona third wave) आलीच तर त्याचा ताण मुख्य रुग्णालयावर (hospital) येऊ नये यासाठी नवीन रुग्णांना (corona new patient) कोविड काळजी केंद्रात उपचारासाठी (corona treatment) दाखल करण्यात येणार आहे. मुख्य रुग्णालयांत मलेरिया-डेंग्यूसह (malaria) कोरोना व्यतिरिक्त इतर आजारातील रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत.

हेही वाचा: मर्कोलाईन्स ट्रॅफिकचा आयपीओ; हायवेची देखभाल व संचालन करणारी आघाडीची कंपनी

सध्या मुंबईत मलेरिया-डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. अशातच सर्दी,ताप,खोकल्याचे रुग्ण देखील पालिकेच्या प्रमुख रुग्णालयाकडे धाव घेतांना दिसत आहेत. मलेरिया,डेंग्यूच्या अनेक रुग्णांना आयसीयू ची गरज भासत आहे. अशात कोविडचे रुग्ण वाढले तर मुख्य रुग्णालयांवर ताण वाढून याचा परिणाम इतर रुग्णांच्या उपचारावर होऊ शकतो.

कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोविड काळजी केंद्र 1 आणि कोविड काळजी केंद्र 2 सज्ज ठेवण्यात आले आहेत. कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 22,363 खाटा तर कोविड काळजी केंद्र 2 मध्ये 25,214 रुग्ण खाटा तयार ठेवण्यात आल्या आहेत. या खाटा आणखी वाढवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. कोविड काळजी केंद्र 1 मधील एकूण 22,363 रुग्ण खाटांपैकी 521 खाटा भरल्या आहेत तर 21,842 रिक्त आहेत. कोविड काळजी केंद्र 2 मध्ये एकूण 25,214 रुग्ण खाटा असून त्यांपैकी 1434 खाटा भरल्या असून 23,780 खाटा रिक्त आहेत. कोविड काळजी केंद्रातील सर्व मिळून 47,577 खाटांपैकी 1955 ( 11%) खाटा भरल्या असून 45,622 (89%) खाटा रिक्त आहेत. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खाटा कमी पडू नयेत यासाठी काळजी केंद्रातील खाटा वाढवण्यात येत आहेत.

" कोविड बाधित रुग्णांना कोविड काळजी केंद्रात दाखल करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. प्रमुख रुग्णालयांत केवळ 5 टक्के खाटा कोविड रुग्णांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. कोविड काळजी केंद्रातील खाटा भरल्या तर प्रमूख रुग्णालयांचा विचार केला जाईल."

- डॉ.रमेश भारमल,संचालक , मुंबई महानगरपालिका प्रमुख रुग्णालय

loading image
go to top