BMC : मुंबईत उद्या फक्त 39 केंद्रांवर लसीकरण; उर्वरित ठिकाणी मोहीम बंद

corona vaccination
corona vaccinationsakal media

मुंबई : कोविड-19 (corona) प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत (vaccination drive) पुरेसा लससाठा (insufficient vaccine) उपलब्ध नसल्यामुळे मुंबई महानगरपालिका (bmc) क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर (vaccination center) उद्या गुरुवारी (Thursday) 26 ऑगस्ट या दिवशी फक्त 39 केंद्रांवर लसीकरण सुरु राहणार आहे. तर, लसीकरण उर्वरित केंद्रांवर बंद राहणार असल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

corona vaccination
मुंबईत अद्ययावत बोन मॅरो प्रत्यारोपण विभाग सुरू ; वाचा सविस्तर

उद्या 23 ठिकाणी कोविशिल्ड आणि 16 ठिकाणी कोव्हॅक्सिन लसीकरण केंद्र सुरु राहणार आहेत. दरम्यान, मुंबईत 441 लसीकरण केंद्र असून त्यातील फक्त 39 केंद्रांवर लसीकरण होईल. त्यामुळे, नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करु नये असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. दरम्यान, मंगळवारी ही बर्‍याच लसीकरण केंद्रांवर लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. तर, बुधवारीही लसीची उपलब्धता नसल्याने बर्‍याच लसीकरण केंद्रांवर डोस दिले गेले नाही. त्यानुसार, उद्या मुंबईतील बऱ्यापैकी शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर लसीकरण होणार नाही.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस घेणे आवश्यक आहे पण, आतापर्यंत अनेकदा मुंबईतील लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. त्यातुन मुंबईकरांची गैरसोय होत असून लोक काही ठिकाणी रात्रीची गर्दी करत आहेत. मुंबईतील काही ठिकाणी डोस घेण्यासाठी रात्रीच कुपन्स वाटले जातात. 1 वाजता रांग लावल्यानंतर सकाळी नंबर येईपर्यंत रात्रीची झोप मोडून रांगेतच असतात असेही चित्र आहे.

corona vaccination
मुंबईत अद्ययावत बोन मॅरो प्रत्यारोपण विभाग सुरू ; वाचा सविस्तर

आजही बर्‍याच ठिकाणी लसीकरण बंद असल्याने लोकांनी रांग लावूनही डोस मिळालेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्येही संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, पालिकेला अद्याप तरी लसीचा साठा उपलब्ध झालेला नाही. पण, रात्रीपर्यंत लसीचे डोस पालिकेला मिळणार असून शुक्रवारपासून पुन्हा पूर्ववत लसीकरण सुरु करण्यात येईल असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डाॅ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

तर, पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, डोस घेऊन येण्यासाठी गाडी पाठवण्यात आली आहे. जर डोस उपलब्ध झाले तरी ते सर्व लसीकरण केंद्रांत वितरणासाठी एक दिवस जाईल त्यामुळे उद्या लसीकरण काहीच ठिकाणी सुरू राहिल. दरम्यान, लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com