esakal | 'या' कारणांसाठी विदेशात जाणाऱ्या नागरिकांना कोविड लसीकरण खुले
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

'या' कारणांसाठी विदेशात जाणाऱ्या नागरिकांना कोविड लसीकरण खुले

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : शैक्षणिक कारणांसाठी (Education), नोकरीसाठी विदेशात (Abroad Job) जाण्‍यास इच्‍छुक असणाऱ्या नागरिकांसह टोकियो ऑलिम्पिकमध्‍ये (Tokyo Olympic) सहभागी होण्‍यासाठी जाणाऱ्या खेळाडूंना (Players) आठवड्यातील सोमवार ते शनिवार अशा सहापैकी कोणत्‍याही दिवशी, महानगरपालिकेने (BMC) नेमून दिलेल्‍या 7 समर्पित कोविड लसीकरण केंद्रावर (Vaccination Center) लस घेता येईल. यापूूर्वी सोमवार ते बुुधवार असे तीन दिवस ही मुुभा होती. मात्र गरज लक्षात घेऊन पालिकेने 31 ऑगस्‍टपर्यंत गुरुवार ते शनिवार अशी तीन दिवसांची सवलत वाढव‍ली आहे. पालिकेच्या वतीने विदेशात जाणारे विद्यार्थी, नोकरदार आणि ऑलिम्पिक खेळाडू यांच्‍यासाठी सात ठिकाणी लसीकरणाची मोहीम (Vaccination Drive) सुरू केली आहे. यात कस्‍तुुरबा रुग्‍णालय, परळ येथील केईएम रुग्‍णालय, अंधेरीतील सेव्‍हन हिल्‍स रुग्‍णालय, कूपर रुग्‍णालय, गोवंडी येथील महानगरपालिका शताब्‍दी रुग्‍णालय,  घाटकोपरमधील राजावाडी रुग्‍णालय, दहिसर जम्‍बो कोविड सेंटरचा समावेश आहे. ( Corona Vaccination Drive Open only For Specific Reason of abroad to people)

कोविशिल्‍ड लसीचा पहिला डोस घेतल्‍यानंतर 84 दिवस पूर्ण होण्‍यापूर्वी अशा नागरिकांना  विदेशात जाणे अत्‍यावश्‍यक असल्‍यास, पहिला डोस घेतल्‍यानंतर किमान 28 दिवसांचे अंतर पूर्ण झाले असल्‍यास त्‍यांना दुुसरा डोस मिळूू शकतो. तसेच संबंधित नागरिकांच्‍या लसीकरण प्रमाणपत्रावर पासपोर्टचा क्रमांक देखील नोंदवला जाणार आहे. जागतिक आरोग्‍य संघटनेने कोविशिल्‍ड ही लस आपत्‍कालीन वापरासाठी मान्‍य केल्‍याने लस प्रमाणपत्रावर कोविशिल्‍ड या लसीचा उल्‍लेख आंतरराष्‍ट्रीय प्रवासासाठी पुरेसा असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

loading image