आज कोरोना लसीकरणाचा शुभारंभ; राज्यात 285 लसीकरण केंद्रांवर तयारी पूर्ण 

भाग्यश्री भुवड
Saturday, 16 January 2021

राज्यात शनिवार, 16 जानेवारीपासून कोरोनावरील लसीकरण मोहीम सुरू होत आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार 285 केंद्रांवर तयारी पूर्ण झाली आहे.

मुंबई  : राज्यात शनिवार, 16 जानेवारीपासून कोरोनावरील लसीकरण मोहीम सुरू होत आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार 285 केंद्रांवर तयारी पूर्ण झाली आहे. प्रत्येक केंद्रावर 100 प्रमाणे सुमारे 28 हजार 500 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी तैनात करण्यात आले आहे. 
ज्यांना लस देण्यात येणार आहे, त्यांना शुक्रवारी सायंकाळपर्यंत संदेश पाठविण्याचे काम सुरू होते. त्यात संबंधितांना केंद्रावर पोहोचण्याची वेळ, केंद्राचे ठिकाण, लशीविषयीची माहिती देण्यात आल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास सांगितले. 

एका लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी पाच जणांचे पथक तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, लसीकरणाच्या शुभारंभप्रसंगी देशातील अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील कूपर हॉस्पिटल, मुंबई आणि जालना जिल्हा रुग्णालयातील लसीकरण सत्राची पंतप्रधान दूरचित्रवाणीद्वारे माहिती घेतील. या दोन्ही ठिकाणी दूरचित्रवाणी संवादाची यंत्रणा तयार करण्यात आली आहे. 
राज्याला कोव्हिशिल्डच्या 9.63 लाख मात्रा कोव्हॅक्‍सिनच्या 20,000 मात्रा प्राप्त झाल्या असून ते सर्व जिह्यांपर्यंत पोहोचवण्यात आले आहेत. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

कोव्हॅक्‍सीन लस ही राज्यातील 6 ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यामध्ये चार वैद्यकीय महाविद्यालये (मुंबई, औरंगाबाद, सोलापूर आणि नागपूर) आणि दोन जिल्हा रुग्णालयांचा (पुणे आणि अमरावती) समावेश आहे. दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच यावेळेत लसीकरण केले जाईल
Corona vaccination launched today Preparations completed at 285 vaccination centers in the state

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona vaccination launched today Preparations completed at 285 vaccination centers in the state