मुंबईत लसीकरणाचा वेग वाढला, दिड महिन्यात तब्बल 'इतक्या' लाभार्थ्यांचं लसीकरण

मिलिंद तांबे
Sunday, 7 March 2021

मुंबईत लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. दिवसाला साधारणता 40 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात येत आहे.

मुंबई:  मुंबईत लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला असून गेल्या दिड महिन्यात तब्बल 3 लाख 50 हजार 84 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. दिवसाला साधारणता 40 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात येत आहे.

मुंबईत 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली असून सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर यांना लस देण्यात येत होती. 1 मार्चपासून 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. काल  मुंबईत 37 हजार 309 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण 3 लाख 50 हजार 84 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

मुंबईत शनिवारी 37 हजार 309 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यातील 31 हजार 629 लाभार्थ्यांना पहिला तर 5 हजार 680 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 3 लाख 50 हजार 84 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 3 लाख 7 हजार 296 लाभार्थ्यांना पहिला तर 42 हजार 788 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 1 लाख 56 हजार 605 आरोग्य कर्मचारी, 1 लाख 8 हजार 933 फ्रंटलाईन वर्कर, 76 हजार 363 जेष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या 8 हजार 183 लाभार्थ्यांना लस देण्यात आली असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

पिका रुग्णालय 3 लाख 12 हजार लाभार्थ्यांना लस

मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर काल 20 हजार 425 लाभार्थ्यांना पहिला तर 4 हजार 706 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 25 हजार 131 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत पालिकेच्या लसीकरण केंद्रात 2 लाख 73 हजार 478 लाभार्थ्यांना पहिला तर 39 हजार 100 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 3 लाख 12 हजार 578 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सरकारी रुग्णालयात 9 हजार लाभार्थ्यांना लस

केंद्र आणि राज्य सरकारच्या रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर शनिवारी 1 हजार 224 लाभार्थ्यांना पहिला तर 120 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 1 हजार 344 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत सरकारी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात 8 हजार 315 लाभार्थ्यांना पहिला तर 782 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 9 हजार 97 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.

खासगी रुग्णालयात 28 हजार लाभार्थ्यांना लस

खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावरील काल 9 हजार 980 लाभार्थ्यांना पहिला तर 854 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 10 हजार 834 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात 25 हजार 503 लाभार्थ्यांना पहिला तर 2 हजार 906 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 28 हजार 409 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona vaccination mumbai month and half 3 lakh 50 thousand 84 beneficiaries vaccinated