corona Vaccination | मुंबईत 4 तर, राज्यासह कोरोना लसीचे एकूण 22 जणांना सौम्य दुष्परिणाम

भाग्यश्री भुवड
Sunday, 17 January 2021

आरोग्य कर्मचार्‍यांनी लसीचा पहिला डोस घेतला. लस घेतल्यानंतर मुंबईत 4 लोक आणि राज्यात 22 लोकांमध्ये किरकोळ दुष्परिणाम दिसून आले.

मुंबई : शनिवारी आरोग्य कर्मचार्‍यांच्या लसीकरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात सुरू झाला. मुंबईसह महाराष्ट्रातील हजारो डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचार्‍यांनी लसीचा पहिला डोस घेतला. लस घेतल्यानंतर मुंबईत 4 लोक आणि राज्यात 22 लोकांमध्ये किरकोळ दुष्परिणाम दिसून आले. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार कोणत्याही लाभार्थीला कोणतेही गंभीर दुष्परिणाम नाहीत.

पहिल्याच दिवशी, राज्यातील एकूण 18,338 आरोग्य कर्मचार्‍यांनी या लसीचा डोस घेतला, त्यापैकी मुंबईची संख्या 1923 होती. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबईत जास्त लोक लस घेत आहेत. लसीच्या दुष्परिणामांबद्दल निर्माण झालेली भीती आता दूर झाली आहे. 

राज्य लसीकरण अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी सांगितले की, रविवारीपर्यंत त्यांना फक्त 22 लाभार्थींमध्ये किरकोळ आरोग्याच्या समस्या आल्याच्या तक्रारी आल्या आहेत. डोकेदुखी, सौम्य ताप, इंजेक्शन दिलेल्या जागेवर सौम्य वेदना यासारख्या सामान्य आरोग्याच्या समस्या जाणवल्या. जेव्हा कोणालाही बीसीजी किंवा इतर कोणतीही लस दिली जाते तेव्हा या समस्या सामान्य असतात. मार्गदर्शक सूचनांमध्ये किरकोळ दुष्परिणाम आणि त्यावरील उपचारांचा उल्लेख केला आहे. चांगली गोष्ट अशी आहे की कोणत्याही लाभार्थींमध्ये कोणतीही गंभीर आरोग्य समस्या नोंदवली गेली नाही. 

मुंबई, रायगड ठाणे परिसरातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी क्लिक करा

मुंबईत सांध्यातील वेदना आणि तापाच्या समस्या -

पालिका आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत रविवारपर्यंत 4 जणांमध्ये हलका ताप आणि सांधेदुखीची नोंद झाली आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लसीकरणानंतर ही आरोग्य समस्या उद्भवते जी काही काळानंतर ठीक होते. पालिकेच्या एका अधिकार्याने सांगितले की लाभार्थ्यांना त्यांच्या वॉर्डचा वॉर रूम क्रमांकही देण्यात आला आहे जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारची आरोग्य समस्या असल्यास ते कॉल करून तक्रार दाखल करू शकतात. त्यानंतर त्यांना कोणत्या रुग्णालयात उपचारांसाठी जायचे आहे हे सांगण्यात येईल.

corona Vaccination In Mumbai,4, while in the state the vaccine has mild side effects in 22 people

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona Vaccination In Mumbai,4, while in the state the vaccine has mild side effects in 22 people