...म्हणून लसीच्या ट्रायलसाठी मुलांचा सहभाग कमी; जाणून घ्या कारण

अँटीबॉडीजची निर्मिती ठरतेय ट्रायलसाठी अडथळा
child vaccination
child vaccinationsakal media

मुंबई : लहान मुलांना देखील कोरोना प्रतिबंधात्मक लस (corona vaccination) हवी यासाठी सर्व स्थरावर प्रयत्न सुरु आहेत. नायर रुग्णालयात (Nair Hospital) कोव्होवॅक्स लसीसाठी (covovax vaccine) ट्रायल सुरु झाली आहे. मात्र त्यासाठी अवघे 9 मुले आढळून आली. आता मुलांमध्ये अँटिबाडी (antibodies in children) निर्माण झाल्याने ट्रायल साठी (less response to trail) कमी संख्येत मुलं आढळून येत आहेत. ही बाब लहान मुलांसाठी लस निर्मितीत प्रमुख अडसर ठरत आहे.

child vaccination
१०० टक्के नवी मुंबईकरांना लशीचा पहिला डोस; MMR क्षेत्रातील पहिली पालिका

कोविडपासून सुरक्षा मिळावी म्हणून लहान मुलांच्या लसीकरणासंदर्भातील क्लिनिकल ट्रायल सध्या पालिकेच्या नायर रुग्णालयात सुरू आहे.  मात्र, सध्या या चाचणीसाठी अडथळे निर्माण होत त्यामुळे, लसीच्या ट्रायलसाठी मुलांचा कमी सहभाग नोंदवला जात आहे. मुंबईत जवळपास 50 टक्के मुलांच्या शरीरात कोविडला तोंड देणाऱ्या अँटीबॉडिजची निर्मिती झाली आहे. आणि या क्लिनिकल ट्रायलला अँटीबॉडीज तयार न झालेली मुले हवी असल्याने अशी पात्र मुलं शोधणं नायर रुग्णालयासाठी आव्हान ठरत आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यातही प्रक्रिया सुरू झाल्यापासून केवळ नऊ मुलांनी यात भाग घेतला आहे.

यावर बोलताना नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले कि, नुकताच झालेल्या सिरो सर्वेत देखील बहुतांश मुंबईकरांमध्ये अँटिबाडी तयार झाल्याचे निदान करत आहे. त्या प्रमाणे लहान मुलांमध्ये देखील अँटीबॉडी तयार झाल्या आहेत. सिरो सर्व्हेतून 50 टक्के मुलांमध्ये अँटीबॉडी तयार झाल्याचे समोर आले. त्यामुळे या दरम्यान जी मुले ट्रायल साठी येत होती त्यांच्या अँटीबॉडी असल्याचे निदान होत होते. शिवाय ट्रायल साठी अँटीबॉडी तयार न झालेली मुले हवी आहेत. आम्ही अशा मुलांच्या शोधात असल्याचे डॉ. भारमल म्हणाले. कोवोवॅक्स लसीच्या ट्रायल साठी एकूण 920 मुलांची गरज असून यातील 460 मुले 12 ते 17 वयोगटातील हवीत. तर 460 मुले 2 ते 11 वयोगटातील हवीत. त्यांना डोस दिल्यानंतर सहा महिने यांचे निरीक्षण चालू राहील.

child vaccination
करंजा बंदरात खारफुटीची बेसुमार कत्तल; न्यायालय, हरित लवादाकडे दाद मागणार

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट मधील कोवोवॅक्स ही लस 90 टक्के उपयुक्त असल्याचे यापूर्वी ट्रायल मधून सिद्ध झाले आहे. या डोसचे प्रत्येक मुलाला दोन डोस  दिल्यानंतर २२ व्यादिवशी नंतर 36 व्या आणि 180 व्या दुवशी शरीरातील अँटीबॉडीची तपासणी करण्यात येईल. नायर रुग्णालयासह भारती हॉस्पिटल आणि पुण्यातील केईएम रुग्णालयात लसीची ट्रायल होत आहे. आतापर्यंत या लसीची जगात 30,000 मुलांवर चाचणी झाली आहे. या लसीची चाचणी ऑस्ट्रेलिया, यूके, दक्षिण आफ्रिका आणि अमेरिकेत करण्यात आली आहे, असेही डॉ. भारमल यांनी सांगितले.

सुदृढ मुलांवरच चाचणी

डॉ. भारमल म्हणाले की, केवळ आरोग्यासंबंधित कोणत्याही तक्रारी नसलेल्या सुदृढ मुलांवरच आणि नवीन अँटीबॉडीज न बनलेल्या मुलांना या चाचणीमध्ये समाविष्ट केले जात आहे. चाचणीपूर्वी सर्व आरोग्य चाचण्या केल्या जातील. जर मुलगा किंवा मुलगी तपासाच्या मानदंडात पात्र सिद्ध झाले, तरच त्याला चाचणीमध्ये समाविष्ट केले जाईल. चौकशीसाठी इच्छुक पालक 022- 23027205, 23027204 वर संपर्क साधू शकतात. या चाचणीत पालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

चाचणीसाठी संमतीपत्र गरजेचे

चाचणीमध्ये सहभागी होणाऱ्या मुलांच्या पालकांकडून संमतीपत्र प्राप्त केले जाईल. पालकांना ऑडिओ-व्हिडिओ आणि लेखी स्वरूपात संमतीपत्र द्यावे लागेल. 7 ते 11 वर्षांच्या मुलांच्या पालकांनी तोंडी संमती देणे आवश्यक आहे आणि 12 ते 17 वर्षे वयाच्या मुलांच्या पालकांनी लेखी संमती देणे आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com