esakal | मुंबईतल्या लसीकरणाबाबत मोठी बातमी, पालिकेनं घेतला महत्त्वाचा निर्णय

बोलून बातमी शोधा

मुंबईतल्या लसीकरणाबाबत मोठी बातमी, पालिकेनं घेतला महत्त्वाचा निर्णय

मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

मुंबईतल्या लसीकरणाबाबत मोठी बातमी, पालिकेनं घेतला महत्त्वाचा निर्णय
sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई: मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेला कोविड-19 लस साठा उपलब्ध झाल्याने आजपासून मुंबईतील निर्देशित 71 पैकी 62 खासगी रुग्णालयात कोविड लसीकरण पुन्हा सुरू होणार आहे. 

बृहन्मुंबई महानगरपालिका आणि शासन यांच्यातर्फे मुंबईत 49 तर खासगी रुग्णालयात 71 लसीकरण केंद्रं कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. या सर्व केंद्रांवर मिळून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्रतिदिन सरासरी 40 ते 50 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येते. 

मुंबईत लसीकरणासाठी मंजुरी मिळालेल्या 71 खासगी रुग्णालयात,10 एप्रिल आणि रविवार, 11 एप्रिल 2021 असे दोन दिवस लसीकरण थांबले होते. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरु होते. लससाठा अधिक प्रमाणावर उपलब्ध होताच खासगी रुग्णालयातही लसीकरण पुनश्च सुरु केले जाईल, असे महानगरपालिकेने यापूर्वीच स्पष्ट केले होते. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

2 लाखांहून अधिक डोस उपलब्ध

शुक्रवारी, 9 एप्रिलला रात्री उशिरा 99 हजार लसी आणि शनिवारी 10 एप्रिलला 1 लाख 34 हजार 970 अश्या एकूण 2 लाख 33 हजार 970 लसींच्या मात्रा मागील दोन दिवसात पालिकेला उपलब्ध झाल्या आहेत. त्यातून खासगी रुग्णालयात लसीकरण केंद्रासाठी लस साठा वितरित करण्यात आला आहे. यामुळे, आजपासून नियमित वेळेत 71 पैकी 62 खासगी लसीकरण केंद्र देखील कार्यान्वित राहतील.

----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Corona Vaccination resumes 62 private hospitals in Mumbai from today April 12