
मुंबई : सीरम इन्स्टीट्यूट (serum institute) ने कमी कालावधीत मोठ्या संख्येने कोव्हीशील्ड लशींचे (corona vaccines) उत्पादन केले असून आता वितरणासाठी मोठ्या संख्येने कोव्हीशील्ड लशी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे लसीकरणातील तुटवडा (less corona vaccines) भरून काढण्यासाठी सीआयआयशी भागीदारी उपयुक्त ठरेल, असे सीरम इन्स्टीट्यूटचे अध्यक्ष आदर पूनावाला ( Adar poonawalla) म्हणाले. (Corona vaccines in huge quantity says serum institute president Adar poonawalla-nss91)
ग्रामीण भागातील लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया व कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) यांच्यात करार झाला आहे. यासंदर्भात पूनावाला यांनी वरील माहिती दिली. देशातील छोट्या शहरांमध्ये व ग्रामीण भागात अजूनही लसीकरणाचा वेग खूपच संथ आहे. कोरोना संपल्यावर देशाचे अर्थचक्र सुरळित होण्यात लसीकरणाचा मोठा वाटा राहील. त्यामुळे सर्व समाजघटक, रुग्णालये व उद्योगसमूह यांच्या सहकार्यातून लसीकरणाचा वेग वाढविण्याचे प्रयत्न होतील, असे सीआयआयचे अध्यक्ष टी. व्ही. नरेंद्रन याबाबत म्हणाले.
सीआयआयने 196 शहरांमधून सर्वेक्षण केले असता लशीचे 70 लाख डोस आवश्यक असल्याचे दिसून आले. सीआयआय व सीआयआय फाऊंडेशन यांच्यातर्फे देशात 34 लाख 75 हजार व्यक्तींना लस देण्यात आली. याच मोहिमेचा पुढचा टप्पा म्हणून देशातील दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीची शहरे तसेच ग्रामीण भागांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सीआयआयतर्फे प्रत्येक राज्यातील गरज लक्षात घेऊन लसीकरण शिबिरे आयोजित करणार आहे.
सामान्यांना लशी का नाहीत ?
भरपूर लशींचे उत्पादन झाले असेल तर अजूनही मुंबईत सरकारी लसीकरण केंद्रांवर फक्त 100 लशीच का येतात. चार पाच तास रांगेत उभे राहूनही सामान्यांना लस का मिळत नाही, असे प्रश्नही विचारले जात आहेत. एकीकडे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनीच केंद्रीय आरोग्यसचिव राजेश भूषण यांना पत्र लिहून मुंबईसाठी पुरेसे लशींचे डोस पाठवावेत अशी मागणी केली आहे. तर आता सीरमकडे पुरेशा लशी असल्याने नव्या धोरणानुसार राज्य सरकार आपल्या रुग्णालयांच्या नावे लशींचे डोस थेट उत्पादकांकडून विकत घेऊ शकतात, असे भाजप नेते अतुल भातखळकर यांनी सुनावले आहे. आता खासगी रुग्णालयातून लशींसाठी जागा मागणी नसल्याने त्यांची स्पर्धा सरकारला नाही. मात्र या लशी न घेणाऱ्या राज्य सरकारचे अपयश पुन्हा एकदा दिसले आहे, असेही भातखळकर म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.