esakal | Corona vaccines : मुंबईत पुन्हा लसीचा तुटवडा, मर्यादित केंद्रांवर लसीकरण!
sakal

बोलून बातमी शोधा

 covid vaccine

Corona vaccines : मुंबईत पुन्हा लसीचा तुटवडा, मर्यादित केंद्रांवर लसीकरण!

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : मर्यादीत लससाठा उपलब्ध (less Corona Vaccines) असल्याने आज 20 जुलै 2021 रोजी मुंबईतील 58 पालिका आणि शासकीय केंद्रांवरच कोविड लसीकरण (Corona Vaccination) सुरू राहणार आहे. कोविड-19 प्रतिबंध लसीकरण (Vaccination Drive) मोहिमेतंर्गत मर्यादीत प्रमाणात लससाठा उपलब्ध असल्याने 309 पैकी 58 निवडक महानगरपालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांवर (Government Vaccination)  लसीकरण सुरु राहिल. या 58 लसीकरण केंद्रांची यादी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) समाजमाध्यमांवर प्रकाशित करण्यात आली आहे. ( Corona Vaccines less in Mumbai limited centers for corona vaccination - nss91 )

लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेऊन मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय, लसीकरण केंद्रांवर जास्त गर्दी करु नये असेही आवाहन करण्यात आले आहे.

loading image