पालिका अॅक्शन मोडमध्ये, आठवड्याभरात हजाराहून अधिक  नवे ICU बेड्स

पालिका अॅक्शन मोडमध्ये, आठवड्याभरात हजाराहून अधिक  नवे ICU बेड्स

मुंबई: कोविडची दुसरी लाट शिखरावर पोहोचलेली असताना राज्य सरकारने लॉकडाऊनची तयारी सुरु केली आहे. महानगर पालिकेनं आता आयसीयू बेड्सची संख्या वाढविण्यास सुरुवात केली आहे. 325 नवे आयसीयू बेड्स महानगर पालिकेने तयार केले असून आता ही संख्या 2 हजार 466 पर्यंत पोहोचली आहे. सात दिवसात 125 नवे आयसीयू बेड्स तयार होणार आहेत. सकाळने शुक्रवारच्या अंकात मुंबईत आयसीयू बेड्स आणि व्हेटीलेटर मिळत नसल्याबद्दल रुग्णांची व्यधा मांडली होती. 

वेळोवेळी सकाळने रुग्णांची बेड अभावी होणारी फरपट मांडली आहे. आता महानगर पालिकेनं मुंबईतील विविध रुग्णालयात 325 आयसीयू बेड्स उपलब्ध करुन दिले आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली. तसेच येत्या सात दिवसात 1 हजार 100 बेड्स उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यात 125 आयसीयू बेड्सचाही समावेश असेल असेही आयुक्तांनी सांगितले. सध्या सार्वजनिक तसेच खासगी रुग्णालये मिळून 19 हजार 151 बेड्स उपलब्ध असून त्यातील 3 हजार 777 बेड्स रिक्त आहेत.

महानगर पालिकेने शहर, पूर्व उपनगर आणि पश्‍चिम उपनगर अशा तीन ठिकाणी तीन जंम्बो कोविड केंद्रात प्रत्येक 1 हजार बेड्स तयार करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता ही क्षमता दुप्पट्टीने वाढविण्यात येणार आहे. प्रत्येक जंम्बो केंद्रात 2 हजार बेड्स अशा प्रकारे सहा बेड्स उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यात 200 आयसीयू आणि 80 टक्के ऑक्सिजन बेड्स असतील, अशी माहितीही महानगर पालिकेने दिले आहे. दिड महिन्याच्या आत हे केंद्र उभे करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

675 बेड्स वाढले

वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्रात 150 तर, पोद्दार महाविद्यालयात 225 कोविड बेड्स लपलब्ध झाले आहेत. नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया मधील बेड्सची संख्या 500 वरुन 800 करण्यात आली आहे. यातील 70 टक्के बेड्सना कृत्रिम ऑक्सिजनची सुविधा देण्यात आली आहे. कोविडची रुग्णसंख्या वाढू लागल्यावर महानगर पालिकेने कोविड साठी आरक्षित बेड्स वाढविण्यास सुरुवात केली आहे. त्याच बरोबर कोविड उपचार केंद्रही सुरु करण्यात आले आहे. वरळीतील या दोन कोविड उपचार केंद्राचे  पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन झाले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, प्रभाग समिती अध्यक्ष दत्ता नरवणकर,अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल उपस्थित होते. वरळी येथील नॅशनल स्पोर्टस क्लब ॲाफ इंडिया येथे 500 बेड्सचे कोविड केंद्र सुरु होते. त्याचा विस्तार करण्यात आला असून क्षमता 800 बेड्सपर्यंत वाढविण्यात आली आहे.

---------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Corona Virus bmc set 1100 new icu beds week 675 beds increased

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com