esakal | मुंबईत रुग्णवाढ नियंत्रणात, पण मृतांचा आकडा वाढताच

बोलून बातमी शोधा

Corona Patients

मुंबईत रुग्णवाढ नियंत्रणात, पण मृतांचा आकडा वाढताच

sakal_logo
By
मिलिंद तांबे - सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुंबईत रुग्णवाढ नियंत्रणात असली तरी मृतांचा आकडा अद्याप कमी झालेला नाही. गुरुवारी देखील दिवसभरात 82 रुग्णांचा मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा आकडा 13 हजार 072 वर पोहोचला आहे. काल मृत झालेल्यापैकी 57 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 43 पुरुष तर 39 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 3 रुग्णांचे वय 40 वयोगटाच्या खालील होते.  28 रुग्णांचे वय 40 ते 60 वयोगटातील होते तर 51 रुग्णांचे वर 60 वर्षाच्या वर होते.

गुरुवारी 4192 नवीन रुग्ण सापडले असून कोरोनाग्रस्तांचा एकूण संख्या 6 लाख 44 हजार 699 इतकी झाली आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 64 हजार 018 हजारांवर आला आहे. नव्या रुग्णांची संख्या स्थिरावल्याने रुग्णवाढीचा दर 0.86 पर्यंत खाली आला आहे.

मुंबईत कोरोना चाचण्यांवर भर देण्यात येत असून आतापर्यंत 53 लाख 80 हजार 473 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88 टक्के आहे. कोरोना रुग्ण वाढीचा सरासरी दर 0.86 टक्के आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन 79 दिवसांवर आला आहे. मुंबईत गुरुवारी 5 हजार 650 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 5 लाख 66 हजार 051 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या 64 हजार 018 सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

मुंबईत 115 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 1 हजार 101 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 29 हजार 615 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. काल कोविड काळजी केंद्र 1 मध्ये अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल 934 करण्यात आले.

धारावीतील 29 नवे रुग्ण

धारावीतील रुग्णसंख्या नियंत्रणात आली असून धारावीत काल 29 नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या 6 हजार 422 वर पोहोचली आहे. दादर मध्ये गुरुवारी 60 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या 8 हजार 825 झाली आहे. माहीममध्ये 55 रुग्ण सापडले असून एकूण रुग्ण 8 हजार 907 इतके रुग्ण झाले आहेत. मुंबई प्रमाणे जी उत्तर मधील रुग्णसंख्या देखील कमी झाली आहे. जी उत्तर मध्ये काल 144 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 24 हजार 154 झाली आहे.

-------------------------

(संपादन- पूजा विचारे)

corona virus death toll rises in Mumbai 82 patients died