चिंता वाढली, आठवड्याभरात मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ

चिंता वाढली, आठवड्याभरात मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ

मुंबई: गेल्या महिन्याभरापासून मुंबईतील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून केवळ आठवड्याभरात 6 हजार 567 नव्या रुग्णांची भर पडली आहे. महत्वाचे म्हणजे यातील 5 ते 6 टक्के रुग्णांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून त्यांची फुफ्फुसे पांढरी होत असल्याचे पुढे आले आहे. 

रुग्णवाढीचा दर वाढताना दिसत आहे. 19 फेब्रुवारीला 0.18 असणारा रुग्णवाढीचा दर वाढून 0.28 वर पोहोचला आहे. रुग्णवाढीचा दर 0.9 टक्क्यांनी वाढला आहे. तर एकूण रुग्णांची संख्या 3,17,310 वरून 3,23,877 इतकी झाली आहे. आठवड्याभरात 6,567 रुग्णांची भर पडली आहे.

मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर ही 137 दिवसांनी कमी झाला असून 393 दिवसांवरून 256 दिवसांवर खाली आला आहे. त्यामुळे 24 विभागात नियंत्रणात आलेला संसर्ग 11 विभागांत पुन्हा एकदा सक्रिय होताना दिसत आहे. 

गेल्या आठवड्याभरात 1,13,504 कोविड चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंतच्या एकूण चाचण्यांची संख्या 32,30,798 इतकी झाली आहे. चाचण्यांच्या तुलनेत 
पॉझिटिव्ह रेट कमी झाला असून 10.39 वरून 9.99 पर्यंत खाली आला आहे. ऍक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाली झाली असून ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 5276 वरून 8997 पर्यंत वाढली आहे. तर गंभीर रुग्णांची संख्या 5 ने वाढली असून  299 इतकी झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या हळुहळु वाढू लागली आहे. एकीकडे कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे नव्याने आढळून येणाऱ्या कोरोनाग्रस्त रूग्णाच्या छातीचा एक्स-रे रिपोर्टमध्ये कमालीचा बदल झालेला दिसून येत आहे. 50 टक्के रुग्ण असिंटेमॅटिक असले तरी 5 ते 7 टक्के लोकांच्या एक्स-रे रिपोर्टमध्ये व्यक्तीच्या फुफ्फुसांची अतिशय वाईट अवस्था पाहायला मिळत असल्याची माहिती मृत्यू नियंत्रण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी दिली.

कोविड नंतर छातीचे एक्सरे खराब येणाऱ्या 5 ते 7 टक्के रुग्णांनी किमान 2 महिने पोस्ट कोविड ओपीडीत तपासणी करण्याची गरज आहे. त्यातील 3 ते 4 टक्के रुग्णांना कोविड काळात व्हेंटिलेटरची आवश्यकता भासू लागली आहे. अशा रुग्णांमध्ये श्वसनाचे आजार बळावू शकतात तसेच त्यांना डिस्चार्ज नंतर ऑक्सिजनची गरज भासू शकते. अशा रुग्णांना स्टीरॉईड आणि ब्राँकोडायलेटरची आवश्यकता भासते. जे रुग्ण दोन ते तीन महिने पोस्ट कोविडचे उपचार घेतात अशा रुग्णाची समस्या कायमची सुटते. मात्र एक टक्के रुग्णांच्या फुफ्फुसात कायम स्वरूपी अडचणी राहत आहेत.
डॉ. अविनाश सुपे, प्रमुख, मृत्यू नियंत्रण समिती

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Corona Virus Increase number corona patients Mumbai during the week

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com