esakal | रुग्णवाढ स्थिरावली; मात्र राज्यात मृत्यूचं थैमान सुरुच

बोलून बातमी शोधा

Maharashtra Corona Virus
रुग्णवाढ स्थिरावली; मात्र राज्यात मृत्यूचं थैमान सुरुच
sakal_logo
By
मिलिंद तांबे : सकाळ वृत्तसेवा

मुंबई: राज्यात मृत्यूचे  थैमान सुरूच असून शनिवारी 676 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मृत्यूचा दर 1.51 % इतका आहे. राज्यात शनिवारी दिवसभरात 67 हजार 160 नवीन रुग्णांची नोंद झाली. कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 42 लाख 28 हजार 836 झाली आहे. रुग्णवाढ स्थिर असली तरी मृतांचा आकडा वाढत आहे.

काल नोंद झालेल्या 676 मृत्यूंपैकी 396 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 280 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.51 % एवढा आहे. राज्यात शनिवारपर्यंत एकूण 6 लाख 94 हजार 480 ॲक्टिव्ह रुग्ण होते.

काल 63 हजार 818 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात कालपर्यंत एकूण 34 लाख 68 हजार 610 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.02 % एवढे झाले आहे.

शनिवारपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,54,60,008 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 42,28,836 (16.61 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 41,87,675 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 29,246 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतेय. परिणामी मृत्यू ही वाढत आहेत. आयसीयू बेडसाठी होणारी धावपळ, उशिरा होणारे निदान, रुग्णालयात उशिरा दाखल होणे ही देखील मृत्यूदर वाढण्यामागील कारणे आहेत. मृत्यू अधिक वाढण्याची शक्यता असून रुग्णवाढ स्थिर झाल्यानंतर साधारणता दोन आठवड्यानंतर मृतांचा आकडा कमी होईल.

डॉ अविनाश सुपे , प्रमुख , राज्य मृत्यू परिक्षण समिती

---------------------------

(संपादन- पूजा विचारे)

corona virus morbidity stabilized death toll in the maharashtra state continues