मुंबईत पुन्हा कोरोनाचा हाहाकार; रुग्णदरात पुन्हा मोठी वाढ; 7 हजारापेक्षा जास्त इमारती सील

मिलिंद तांबे
Friday, 11 September 2020

मुंबईत आजही बाधित रुग्णांचा भडका उडाला असून 2,172 नवे कोरोना रुग्ण सापडले. मुंबईत रूग्णवाढीच्या दरातही वाढ झाली असून तो 1.03 वरून 1.20 टक्क्यांवर  पोहोचला आहे

मुंबई : मुंबईत आजही बाधित रुग्णांचा भडका उडाला असून 2,172 नवे कोरोना रुग्ण सापडले. मुंबईत रूग्णवाढीच्या दरातही वाढ झाली असून तो 1.03 वरून 1.20 टक्क्यांवर  पोहोचला आहे. मुंबईत आज 44 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 8,064 वर पोहोचला आहे. तर, एकूण रुग्णसंख्या 1,65,287 झाली आहे. 

आरक्षणविरोधी कंगनाला पाठींबा का? आठवलेंच्या भूमिकेवर रिपाई नेत्याने दिला राजीनामा

मुंबईत आज 1,132 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 78 टक्के इतका आहे. आज झालेल्या 44 मृत्यूंपैकी 26 जणांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 30 पुरुष आणि 14 महिलांचा समावेश होता. यातील तिघांचे वय 40 हून कमी होते. तर 7 रुग्णांचे वय 60 हून अधिक होते. 34 रुग्ण 40 ते 60 वयोगटादरम्यान होते.                    
दरम्यान, मुंबईत आज 1,132 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 1,29,244 रुग्णांना घरी सोडण्यात आले. मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी 58 दिवसांवर गेला आहे. 10 सप्टेंबरपर्यंत एकूण 8,87,274  कोव्हिड चाचण्या करण्यात आल्या. 

कंगनाच्या अडचणीत वाढ; ड्रग्जप्रकरणी गृहविभागाकडून मुंबई पोलिसांना चौकशीचे आदेश

मुंबईत 542 कंटेन्मेंट झोन 
मुंबईत 542 वस्त्या आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 7,217 आहे. गेल्या 24 तासांत बाधितांच्या संपर्कात आलेले 11,117 संशयित आढळले आहेत.

---------------------------------------------

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona wail again in Mumbai increase in patient rates