जीवावर उदार होऊन आरोग्यसेवा देणाऱ्या कोरोना योद्ध्यांना तीन महिण्यापासून वेतनच नाही; BMCच्या कूपर रुग्णालयातील प्रकार

जीवावर उदार होऊन आरोग्यसेवा देणाऱ्या कोरोना योद्ध्यांना तीन महिण्यापासून वेतनच नाही; BMCच्या कूपर रुग्णालयातील प्रकार


मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने मोठ्या प्रमाणावर डॉक्टर, नर्स तसेच वॉर्ड बॉय आदींची भरती केली. मात्र 3 महिन्यानंतर पालिकेच्या कूपर रुग्णालयातील या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

महानगरपालिकेच्या आर.एन.कूपर रूग्णालयात कोरोना आजारावर मात करण्यासाठी तातडीने थेट काॅंट्रक्ट तत्त्वावर 88 डॉक्टर,नर्सिंग स्टाफ,वाॅर्ड बाॅय ह्यांची भारती करण्यात आली.या कर्मचाऱ्यांनी स्वतःला झोकून देऊन कोरोना संसर्गात काम केले. मात्र जीवावर उदार होऊन सेवा केल्या नंतर ही कर्मचाऱ्यांना मुंबई महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे सलग 3 महिने वेतन मिळाले नाही.

कूपर रुग्णालयातील नवीन कर्मचाऱ्यांवर झालेल्या अन्यायाबाबत माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमण पवित्रा घेतला. मनसे ने आज कूपर रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ पिनाकिन गुजर यांना घेराव घालत जाब विचारला. काही तांत्रिक अडचणीमुळे वेतन देण्यास उशीर झाले असल्याचे सांगत येत्या आठवड्याभरात सर्वांचे वेतन अदा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रुग्णालयाकडून अश्वसनाची पूर्ती न झाल्यास मनसे स्टाईल ने उत्तर देण्याचा इशारा मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस अखिल चित्रे यांनी दिला आहे.

--------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com