esakal | कोरोना ओसरला बाजार बहरला! किरकोळ दुकानदारांना अनेक महिन्यानंतर दिलासा
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना ओसरला बाजार बहरला! किरकोळ दुकानदारांना अनेक महिन्यानंतर दिलासा

दिवाळी म्हणजे मांगल्याचा आणि प्रकाशाचा उत्सव. कोरोनाच्या सात महिन्यांच्या लॉक डाऊनमुळे बंद असणाऱ्या बाजार पेठा पुन्हा सुरु झाल्याने दिवाळी सणाच्या निमित्ताने बाजारात खरेदीसाठी गर्दी वाढू लागली आहे.

कोरोना ओसरला बाजार बहरला! किरकोळ दुकानदारांना अनेक महिन्यानंतर दिलासा

sakal_logo
By
शरद वागदरे


वाशी - दिवाळी म्हणजे मांगल्याचा आणि प्रकाशाचा उत्सव. कोरोनाच्या सात महिन्यांच्या लॉक डाऊनमुळे बंद असणाऱ्या बाजार पेठा पुन्हा सुरु झाल्याने दिवाळी सणाच्या निमित्ताने बाजारात खरेदीसाठी गर्दी वाढू लागली आहे. पुजेच्या साहित्याबरोबर आता इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहन, खरेदीसह घर खरेदीला देखील दिवाळीचा मुहूर्त साधला जात आहे. दिवाळी निमित्त शहरामध्ये बाजारपेठेच्या भागाला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाल्याचे पाहायला मिळत आहे.
दिवाळीनिमित्त शहरातील मुख्य वाशी, एपीएमसी मार्केट, येथे ग्राहाकंची गर्दी वाढली आहे. वाशी, कोपरखैरणे, जूहूगांव, ऐरोली, नेरुळ आदी ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा तसेच पदपथवार विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. यामुळे या रस्त्यावर चालणे देखील अवघड झाले आहे. शनिवारी लक्ष्मी पुजनाचा दिवस असल्यामुळे पुजेचे साहित्य, फराळ, मिठाई खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी झाली आहे.

हेही वाचा - हिवाळी अधिवेशनाबाबत सरकार पळ काढते आहे; प्रवीण दरेकर यांची टीका

पुजाच्या साहित्याला मागणी
लक्ष्मीपुजनासाठी लागणाऱ्या पुजेच्या साहित्यांनी बाजारपेठे सजली असुन शहरातील  वाशी येथील शिवाजी चौक, सीबीडी बेलापुर येथील पनेवल मधील शिवाजी चौक परिसरात नागरिकांची खरेदीसाठी गर्दी झाली आहे. झेंडूंची फुले, पुजेचे साहित्य, केरसुणी, रांगोळी, ऊस, केळीची पाने, नारळ, आब्यांची पाने, केळीचे खांब व लक्ष्मीच्या मुर्तीची खरेदी करण्यात येत आहे. 

झेंडूच्या फुललाच्या  किंमतीत वाढ
सणासुदीत पुजेसाठी झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. दिवाळीसारख्या सणाला तर फलांच्या मागणीत वाढ झाली आहे. शनिवारी लक्ष्मीपुजन असल्यामुळे बाजारपेठेत झेंडुच्या फुलांची मागणी वाढली आहे. झेंडूच्या फुलांचे भाव यंदा 150 ते 200 रुपये किलोपर्यत पोहचले आहे. मागील वर्षी दिवाळीच्या वेळी फुलाचे भाव हे 80 ते 100 रुपये फुलांच्या मागणीत वाढ झाल्याने हे दर वाढलेले आहे. तर अतिवृष्टीच्या पावसामुळे यंदा झेंडूच्या फुलाचे नुकसान झाले आहे. त्यातच डिझेल च्या वाढलेल्या दरामुळे वाहतुकीच्या खर्चात देखील वाढ झाली आहे. म्हणून फुलाचे दर वाढले आहे.  असे फुल विक्रेते संतोष उंडे यांनी सांगितले.

हेही वाचा - आदिवासी महिलांनी तयार केलेल्या आकाश कंदिलांनी उजळणार राजभवन

तरुणाईची कपडे खरेदी
डिझायनर ड्रेस मटरिअल, कॅटलॉक, पाटियाला, पार्टी वनपीस, कुर्ती असे विविध प्रकाराचे ड्रेसची युवतींमध्ये चलती आहे. ग्राहाकंना आकर्षित करण्यासाठी आकर्षक असल्याचे दिसून येत आहे. तर तरुणांमध्ये जीन्स, पार्टी वेअर शर्ट, प्रिटेंड शर्ट, टि शर्ट यांची क्रेझ जास्त आहे. 

Corona weaken market flourished Relief to retailers after several months

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )