सरकारी कर्मचाऱ्यांना धसका 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 मार्च 2020

बहुतांश कर्मचारी हजर असले तरी त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने लावलेले मास्क ही बाब अधोरेखीत करत आहे. काही सरकारी कार्यालयात कर्मचारी वारंवार सॅनिटायझरचा वापर करतानाही दिसत आहेत. 

अलिबाग : कोरोनाची धास्ती रायगड जिल्हाधिकारी कार्यालयापासून जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि अन्य सरकारी कार्यालयात दिसत आहे. बहुतांश कर्मचारी हजर असले तरी त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने लावलेले मास्क ही बाब अधोरेखीत करत आहे. काही सरकारी कार्यालयात कर्मचारी वारंवार सॅनिटायझरचा वापर करतानाही दिसत आहेत. 

हे  वाचा : बाजारातील घसरण; गुंतवणुकीवर प्रभाव

जिल्ह्यातील एसटी, जिल्हा परिषदेमधील ग्रामीण पाणीपुरवठा, अर्थ विभाग, बांधकाम विभाग, नगरपालिका, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी असते. या गर्दीतून कोरोना होऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांनीदेखील काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. काही जण मास्क लावून आहेत; तर काही जण सॅनिटायझरचा वापर करत आहेत. कार्यालयात गर्दी होऊ नये यासाठी एक ते दोन नागरिकांना कार्यालयात घेण्याची सोय केली आहे.

हे वाचा : ‘ती’ टॅक्सी कोरोना घेऊन फिरत होती..

 जनजागृतीपर उपक्रमही प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आले आहेत. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने वेगवेगळ्या कार्यालयासमोर कोरोना जनजागृतीबाबत बॅनर लावण्यात आले आहेत. तसेच आरोग्य रथाची सुविधा करण्यात आली आहे. कोरोना होऊ नये याची काळजी कशी घ्यावी, याचा सल्ला रथाद्वारे ग्रामीण व शहरी भागात पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona's fears are visible from the Raigad District Collector's office to the Zilla Parishad, Panchayat Samiti and other government offices.