मुंबईत कोरोनाचा विळखा आणखी घट्ट; कोरोनामुक्तीच्या दरातही घट; 11 दिवसांत 2 टक्क्यांनी कमी

समीर सुर्वे
Saturday, 12 September 2020

मुंबईत पुन्हा एकदा कोव्हिडची स्थिती गंभीर होत आहे. केवळ रुग्णच वाढत नसून कोव्हिडवर मात करणाऱ्या रुग्णांची संख्याही आता घटत आहे.

मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा कोव्हिडची स्थिती गंभीर होत आहे. केवळ रुग्णच वाढत नसून कोव्हिडवर मात करणाऱ्या रुग्णांची संख्याही आता घटत आहे. सप्टेंबरमध्ये सुरूवातीच्या 11 दिवसांतच रिकव्हरी दरात 2 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. तर, उपचार सुरु असलेल्या रुग्णांमध्येही 2 टक्‍क्‍यांहून अधिक वाढ झाली आहे.

शिवकेबल सेना ही संवैधानिक संस्था नाही; रिपब्लिक टीव्हीने केलेली याचिका निकाली 

मुंबईत 31 ऑगस्टपर्यंत 1 लाख 45 हजार 805 रुग्णांची नोंद होती. तेव्हा फक्त 20 हजार 554 रुग्णांवर उपचार सुरु होते. म्हणजे एकूण रुग्णांच्या 14.09 टक्के रुग्णांवर उपचार सुरु होते. शुक्रवारपर्यंत (ता.11) 1 लाख 65 हजार 278 रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 27 हजार 626 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. म्हणजेच 16.71 टक्के रुग्ण हे अॅक्‍टिव्ह आहेत. यात लक्षण विरहीत रुग्णांचे प्रमाण 68 टक्के आहे. तर, लक्षण असलेले रुग्ण 27 टक्के असून अत्यावस्थ रुग्णांचे प्रमाण 5 टक्के आहे, अशी माहिती महापालिकेकडून प्रसिध्द करण्यात आली आहे. 
साधारण 15 ऑगस्टनंतर अॅक्‍टिव्ह रुग्णांची संख्या कमी होत होती. मात्र, सप्टेंबरच्या पहिल्या दिवसापासून पुन्हा अॅक्‍टिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. रिकव्हरी दरही सप्टेंबरच्या पहिल्या 12 दिवसांत 2 टक्‍क्‍यांनी घटला आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत रिकव्हरी दर म्हणजे कोव्हिडवर मात केलेल्या रुग्णांचे प्रमाण 80 टक्के होते. ते 11 सप्टेंबररोजी 78 टक्‍क्‍यांवर आले आहे.

वय वर्ष 20 पण चोरल्या तब्बल 10 बुलेट; नंबर प्लेट काढून 40-50 हजारात विक्री 

बोरिवलीत सर्वाधिक रुग्णवाढ
शुक्रवारपर्यंत सर्वाधिक रुग्णांची नोंद बोरीवली आर मध्य प्रभागात झाली. येथे 9864 रुग्ण आढळले. त्या खोलोखाल मालाड पी उत्तर प्रभागात 9824 रुग्ण नोंदविण्यात आले आहे. तर, अंधेरी पुर्व के पुर्वमध्ये 9793 आणि के पश्‍चिम अंधेरी पश्‍चिम येथे 9485 आणि दादर, माहिम, धारावीचा समावेश असणाऱ्या जी उत्तर विभागात 9137 रुग्णांची नोंद झाली आहे.
--------
31 ऑगस्ट
एकूण रुग्ण - 1,45,805
कोरोनामुक्त रुग्ण  -117268
अॅक्‍टिव्ह रुग्ण - 20554
---
11 संप्टेबर
एकूण रुग्ण - 165278
कोरोनामुक्त रुग्ण - 129244
अॅक्‍टिव्ह रुग्ण - 27626

------------------------------------------ 

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronas grip is even tighter in Mumbai Reduction in the rate of coronafree patient