मुंबईतील 'हा' हायप्रोफाईल परिसर ठरतोय कोरोनाचा नवा हॉटस्पॉट; एका महिन्यात तब्बल 'इतक्या' जणांना लागण

भाग्यश्री भुवड
Thursday, 17 September 2020

वांद्रे कुर्ला संकुल म्हणजेच बीकेसी हा कोरोनाचा नवा हॉटस्पॉट झाला आहे. गेल्या महिना भरात बीकेसीमध्ये काम करणारे 60 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

मुंबई: वांद्रे कुर्ला संकुल म्हणजेच बीकेसी हा कोरोनाचा नवा हॉटस्पॉट झाला आहे. गेल्या महिना भरात बीकेसीमध्ये काम करणारे 60 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. यातील अनेक लोक दक्षिण मुंबईच्या डी वॉर्डमध्ये राहत असून त्यात ताडदेव, मलबार हिल आणि नेपियन सी रोड असे परिसर येतात. या विभागात गेल्या तीन दिवसांत 100 हून अधिक केसेस समोर आल्या आहेत. 

विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रावर कोरोनाचा उल्लेख नाही; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत याची माहिती

गेल्या आठवड्यात पालिकेने नेपियन सी रोड वरील मोठ्या निवासी इमारतीच्या 2 विंग्स सील केल्या. 2 दिवसांत तिथे 20 केसेस आढळल्या. ज्यामुळे, या ठिकाणी कोरोना केसेस वाढताना दिसत आहे. गेल्या काही काळापर्यंत पालिका रहिवासी परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांचे स्क्रिनिंग करत होती. मात्र, लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर ऑफिसमध्ये लोकांना कोविड 19 ची लागण होण्यास सुरुवात झाली. गेल्या काही आठवड्यात बीकेसी मध्ये काम करणाऱ्या 600 लोकांचे स्क्रिनिंग करण्यात आला आणि 100 जणांची चाचणी करण्यात आली. 

पालिकेच्या एका आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, काचेच्या इमारतीत काम करणाऱ्या लोकांना एसीशिवाय पर्याय नसतो. जेवणाचा डब्बा ही त्यांना एसी मध्ये खावा लागतो. संसर्ग पसरण्याचे हे एक मोठं कारण असू शकेल. 

'मी हरामखोर नाही, सगळ्यात जास्त मानधन घेणारी आभिनेत्री'! संजय राऊतांनी माफी मागावी, कंगनाची मागणी

डी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी सांगितलं की, गेल्या काही आठवड्यात बीकेसी संबंधित असलेल्या 50 हून अधिक केसेस समोर आल्या होत्या. ज्यातील बहुतेक लोक हे हिऱ्यांच्या कंपनीत काम करतात. त्यानंतर आम्ही स्क्रिनिंग शिबिरे घेण्यास सुरुवात केली. आम्ही 600 हून अधिक लोकांची स्क्रिनिंग केला ज्यातले बहुतेक लोक पॉझिटिव्ह आढळले. ज्यांना लक्षण आहेत त्यांची आणि त्यांच्या हाय रिस्क संपर्काची अँटी जेन चाचणी ही करण्यात येत आहे. 
 
दरम्यान, सर्व ऑफिस आणि कमर्शियल कॉम्प्लेक्सनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची चाचणी करण्याची गरज आहे. बीकेसीची शॉपकिपर्सची स्क्रिनिंग आणि चाचणी करण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. चाचण्या पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्ण राहत असलेल्या वॉर्डमधील अधिकाऱ्यांना तसे कळवण्यात येते.

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronas new hotspot is becoming a high profile area

टॉपिकस