Coronavirus Mumbai | चाचण्यांचे प्रमाण वाढल्यामुळे रुग्णसंख्या वाढली; मृत्यूचे प्रमाण कमी

Coronavirus Mumbai | चाचण्यांचे प्रमाण वाढल्यामुळे रुग्णसंख्या वाढली; मृत्यूचे प्रमाण कमी


मुंबई, - गेल्या दोन आठवड्यांत नवीन कोविड -19 च्या केसेस मध्ये वाढ झाली आहे. पण, गेल्या महिन्याच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण कमी झाले असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाची आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. दरम्यान, चाचण्यांचे प्रमाण वाढवल्यामुळे संख्या वाढलेली दिसू शकते असे राज्य टास्क फोर्स समितीचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी स्पष्ट केले आहे.  दरम्यान, राज्य कोविड 19 टास्क फोर्सच्या विश्वास आहे की मृत्यूदर कमी असणे ही चांगली बाब आहे. दरम्यान, बहुतेक नवीन संक्रमित रुग्ण फक्त सौम्य आणि मध्यम स्वरुपाच्या लक्षणांची आहेत.
.

चाचण्यांचे प्रमाण अधिक -
राज्यात दिले जाणारे सर्व आकडे हे खरे आहेत. अकोला, अमरावती, पुणे, या ठिकाणी संख्या वाढलेली आहे. राजकीय कार्यक्रम, लग्नाचे समारंभ आणि कोविडचे सुरक्षेसाठी असलेले नियम अजिबात न पाळणे ही प्रमुख कारणे आहेत. मात्र, या सर्वांवर आपल्या योग्य ते उपचार माहिती आहेत. शिवाय, जर लोक योग्य वेळेत आले तर मृत्यूदर आणखी नियंत्रित ठेवण्यात यश मिळू शकेल. मुंबईच्या तीन वॉर्डमध्ये संख्या जास्त आहे. पण, त्या वॉर्डमध्ये मृत्यूदर नियंत्रित ठेवण्यामध्ये पालिकेला यश आले आहे. चाचण्या आणि ट्रॅकिंग हे पुन्हा मोठ्या संख्येने वाढवले आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारची संख्या आणि मृत्यू कमी झाले आहेत. म्हणजेच आता जी पाऊले उचलली जात आहेत ती कणखरपणे उचलली गेली तर लॉकडाऊनचा मार्ग स्विकारण्याची गरज भासणार नाही. छोट्या छोट्या परिसरात जिथे संख्या वाढली आहे ते परिसर काही काळापुरते म्हणजे सात दिवसापर्यंत बंद करावे लागतील. पण, त्यातही आपण यशस्वी होऊ शकतो. चाचण्यांमध्ये झालेली वाढ हे नवीन कोविड 19 च्या प्रकरणांमध्ये वाढ होण्यामागचे एक कारण असू शकते. कारण, जेवढ्या जास्त पॉझिटिव्ह चाचण्या तेवढी पॉझिटिव्ह संख्या मिळणार असे राज्य कोविड -19 टास्क फोर्स समितीचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी सांगितले.

दरम्यान, नवीन कोविड 19 च्या प्रकरणांमुळे रुग्णालये हळूहळू पुन्हा भरु लागली आहेत. शिवाय, बहुतेक रुग्णांना सौम्य आणि मध्यम स्वरुपाचा संसर्ग आहे.
...........................................................
गेल्या महिन्यात 1 ते 21 जानेवारी दरम्यान पुणे, अमरावती, यवतमाळ आणि अकोला येथे अनुक्रमे 10,664, 1,152, 1,083 आणि 770 नवीन कोविड -19 केसेस नोंदल्या गेल्या. मात्र, या महिन्यात 21 फेब्रुवारीपर्यंत ही संख्या पुण्यात 11,600, अमरावतीत 8,350, अकोल्यात 2,070 आणि यवतमाळ मध्ये 1,572 वर पोहचली. दरम्यान, त्याच काळात मुंबईत कोविड -19 च्या केसेसमध्ये 7% घट झाली. गेल्या महिन्यात 21 जानेवारीपर्यंत मुंबईत 10,586 नोंद झाली होती आणि तेच प्रमाण 1 ते 21 फेब्रुवारी दरम्यान 9,825 पर्यंत कमी झाले.
यामुळे वैद्यकीय तज्ज्ञ आणि पालिका अधिकाऱ्यांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे. रविवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधत सांगितले की, पुढील आठ दिवस परिस्थितीचा आढावा घेणार आणि त्यानंतर लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल.

कोविड -19 च्या वाढत्या संख्येतही एक महत्त्वाची बाब आहे आणि ती म्हणजे राज्यातील एकूण मृत्यु दर जानेवारी 1 जानेवारी रोजी नोंदवण्यात आलेल्या 2.56% वरून 21 फेब्रुवारीपर्यंत 2.47% पर्यंत खाली आला आहे. तसेच, पुणे, अमरावती, यवतमाळ आणि अकोला या राज्यातील सर्वाधिक पॉझिटिव्ह केसेसची नोंद होणाऱ्या  जिल्ह्यांमध्येही मृत्यूचे प्रमाण याच कालावधीच्या तुलनेत 1 ते 21 फेब्रुवारी दरम्यान कमी नोंदले गेले आहे.
तसेच पुणे, अमरावती, यवतमाळ आणि अकोला यासारख्या जिल्ह्यांमध्ये राज्यात सर्वाधिक पॉझिटिव्हीचे प्रमाण नोंदवणारे हे प्रमाण गेल्या महिन्याच्या याच कालावधीच्या तुलनेत 1 ते 21 फेब्रुवारी दरम्यान कमी झाले आहे.
उदाहरणार्थ, 50 टक्के पॉझिटिव्ह दरासह अमरावतीत गेल्या 21 दिवसांच्या तुलनेत 1 ते 21 जानेवारी या काळात 600 टक्क्यांनी केसेस वाढले आहेत. परंतु, या महिन्याच्या शेवटच्या 21 दिवसांत मृत्यु दर जानेवारीच्या तुलनेत 0.86% वरुन 0.41% पर्यंत खाली आला आहे. त्याचप्रमाणे अकोल्यातील मृत्यूचे प्रमाण 1.94% वरून 0.33% वर खाली आले आहे. पुण्यात मृत्यू दर 0.56 ते 1.10 पर्यंत खाली आला आहे. जानेवारीत 21 तारखेपर्यंत मुंबईत 1.4% मृत्यू दर नोंदला गेला जो या महिन्यात 0.86% पर्यंत खाली आला आहे. दरम्यान, यवतमाळमध्ये जानेवारीच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण 2.40 टक्क्यांवरून वाढून या महिन्यात 2.92 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
.....................................................

“ जेव्हा व्हायरसमध्ये बदल होतात, तेव्हा केसेस वाढणे ही सामान्य घटना आहे. मात्र, असे आढळून आले आहे की बदललेल्या व्हायरसची तीव्रता मूळ व्हायरसच्या तुलनेत नेहमी कमी असते. त्यामुळे, जर कोविड -19  च्या नवीन प्रकाराचा लोकांना संसर्ग होत असेल तर त्याची तीव्रता कमी असेल. मृत्यूदर कमी असण्यामागे हे ही कारण असू शकते असे अमरावतीचे जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) डॉ. दिलीप रानमले यांनी सांगितले.

---------------------------------------------------- 

( Edited by Tushar Sonawane )

Coronavirus Mumbai As the number of tests increased so did the number of patients marathi news update

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com