esakal | मुंबई: 22 जणांचा मृत्यू; 660 नव्या रुग्णांची भर
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

मुंबई: 22 जणांचा मृत्यू; 660 नव्या रुग्णांची भर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
  • धारावीत 8 तर दादरमध्ये 7 नवे रूग्ण

मुंबई: शहरात दोन दिवसांपूर्वी मृत्यूचे प्रमाण (Death Rate) १०च्या खाली गेले होते. पण गेले दोन दिवस यात पुन्हा वाढ (Increase) होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत (Mumbai) एकूण 22 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मुंबईतील मृतांचा (Deaths) आकडा 15 हजार 122 इतका झाला आहे. आज मृत झालेल्यापैकी 18 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 14 पुरुष तर 8 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 3 रुग्णांचे वय 40 ते 60 वयोगटातील होते तर 19 रुग्णांचे वर 60 वर्षाच्या वर होते. दिवसभरात 660 नवीन रुग्ण (New Cases) सापडले. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची (Coronavirus Infected) एकूण संख्या 7 लाख 14 हजार 450 इतकी झाली आहे. तर 768 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 6 लाख 81 हजार 288 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 65 लाख 34 हजार 969 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. (Coronavirus Updates in Mumbai 22 deaths in last 24 hours 660 New Cases Found)

हेही वाचा: ‘परमबीर सिंह यांनी २०० कोटी मागितले’

कोरोना रुग्णवाढीचा सरासरी दर 0.12 टक्क्यांवर आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी 566 दिवसांवर गेला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर पोहोचला आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 15,811 हजारांवर आला आहे. मुंबईत 25 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 93 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 7,737 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल 841 करण्यात आले.

हेही वाचा: मुंबईकरांसाठी पावसाळ्यातील 'हे' १८ दिवस धोक्याचे

धारावीत 8 तर दादरमध्ये 7 नवे रूग्ण

धारावीत आज 8 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 6856 झाली आहे. दादर मध्ये 7 नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांचा आकडा 9529 वर पोचला आहे. तर माहीम मध्ये आज 11 नवे रुग्ण सापडले असुन एकूण रुग्ण 9851 झाले आहेत. जी उत्तर मध्ये आज 26 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांचा आकडा 26,236 झाला आहे.

हेही वाचा: मुंबईत पाऊस is Back!! लोकल सेवा सुरळीत; रस्ते वाहतूक मंदावली