esakal | मुंबईत दिवसभरात अडीच हजार रुग्णांची कोरोनावर मात
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus

कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यात मुंबई महापालिकेला हळूहळू यश

मुंबईत दिवसभरात अडीच हजार रुग्णांची कोरोनावर मात

sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: शहरात कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यात मुंबई महापालिकेला (BMC) हळूहळू यश येत आहे. त्यामुळे, नवे कोरोनाबाधित रुग्ण (New Covid Cases) आढळण्याच्या संख्येपेक्षा कोरोनामुक्त (Discharged Patients) रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आज दिवसभरात 2 हजार 587 रुग्णांनी कोरोनावर (Corona free) मात केली. त्यामुळे, आतापर्यंत एकूण 6 लाख 39 हजार 340 रुग्ण कोरोनामुक्त झाले. रिकव्हरी रेट (Recovery Rate) म्हणजे रूग्ण बरे होण्याचा दर आता 93 टक्क्यापर्यंत पोहोचला आहे. (Coronavirus Updates Mumbai BMC on 17 May 2500 People are Covid 19 Free)

हेही वाचा: मुंबई: तरूणाला विनामास्क पकडलं अन् पोलिसांना बसला धक्का

मुंबईत दिवसभरात 1 हजार 240 नवीन रुग्णांची नोंद झाल्याने कोरोनाबाधित रुग्ण संख्या 6 लाख 89 हजार 936 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात ४८ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 14 हजार 308 वर पोहोचला आहे. त्यामुळे, मुंबईत सध्या 34 हजार 288 सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. रूग्ण दुपटीचा दर कमी झाला असून कालावधी 246 दिवसांवर गेला आहे. तसेच, कोविड रुग्णवाढीचा दर आता केवळ 0.28 टक्के इतका आहे.

(संपादन- विराज भागवत)