esakal | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात कोर्टाने जारी केले समन्स | Anil deshmukh
sakal

बोलून बातमी शोधा

anil deshmukh

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात कोर्टाने जारी केले समन्स

sakal_logo
By
सुनिता महामुनकर

मुंबई : भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे (corruption Allegations) अडचणीत आलेले माजी गृहमंत्री अनील देशमुख (Anill deshmukh) यांच्या विरोधात आता महानगर दंडाधिकारी न्यायालयाने (court) आज समन्स (summons) जारी केले. वारंवार समन्स बजावूनही ईडिच्या चौकशीला (Enforcement directorate) हजर न झाल्याबद्दल ही कारवाई न्यायालयाने सुरु केली आहे. यामुळे देशमुख यांच्या अडचणीत भर पडली आहे.

हेही वाचा: मुंबईत 72 हजारांहून अधिक होम आयसोलेशन रुग्ण

देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी भ्रष्टाचाराचे आणि खंडणी वसुलीचे गंभीर आरोप केले आहेत. सीबीआय ने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच ईडिने देखील यावर चौकशी सुरू केली असून आतापर्यंत पाचवेळा देशमुख यांना समन्स बजावले आहे. परंतु देशमुख यांनी या चौकशीला हजेरी लावली नाही. त्यामुळे आता ईडिने देशमुख यांच्या विरोधात दंडाधिकारी न्यायालयात दावा दाखल केला आहे. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर एम नेरळीकर यांनी शुक्रवारी या दाव्याची दखल घेऊन खटल्याची कारवाई सुरू केली आहे. देशमुख यांनी ता. 16 नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे समन्स जारी केले.

भादवि कलम 174 नुसार सरकारी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करुन अडथळा आणणे असा आरोप ईडिने देशमुख यांच्यावर ठेवला आहे. देशमुख यांना जून 20, 28, जुलै 2, 30 आणि जगस्ट 16 ला एकूण पाच समन्स बजावले आहेत. पण एकाचीही दखल त्यांनी घेतली नाही, त्यामुळे दावा दाखल केला असे ईडिच्या वतीने एड श्रीराम शिरसाट आणि एड अरविंद आघाव यांनी न्यायालयात सांगितले.

या कलमानुसार एक महिना कारावास किंवा पाचशे रुपये दंड अथवा दोन्ही अशी शिक्षेची तरतूद आहे. ईडिने देशमुख यांचे स्वीय सहकारी संजीव पलांडे आणि खासगी सचिव कुंदन शिंदे यांना अटक केली आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात त्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. बडतर्फ पोलीस सचिन वाझेच्या मार्फत खंडणी वसूल करुन मनी लॉण्ड्रिंगमार्फत त्याचा वापर केला असा आरोप ईडिने देशमुख यांच्या वर ठेवला आहे. देशमुख यांनी ईडिच्या समन्स विरोधात उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका केल्या आहेत.

loading image
go to top