Sudhir Mungantiwar: कापूस खरेदीला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी; सुधीर मुनगंटीवार यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Cotton Purchase: सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कापूस खरेदीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. २७ फेब्रुवारी २०२६ ची अंतिम मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवावी अशी विनंती मुनगंटीवार यांनी केली आहे.
Sudhir Mungantiwar

Sudhir Mungantiwar

sakal

Updated on

मुंबई : राज्याचे माजी मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सन २०२५-२६ हंगामातील कापूस खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. खरेदीसाठी जाहीर करण्यात आलेली २७ फेब्रुवारी २०२६ ही अंतिम मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढविण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com