Palghar News : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला आणि अटक वॉरंटची मागणी

पालघरमधील खाजगी रुग्णालयात डॉक्टरांना शिवीगाळ, कर्मचाऱ्यांना धमकी आणि मारहाणीच्या प्रकरणाने आता चांगलेच वळण घेतले आहे.
Rahul Gharat

Rahul Gharat

sakal

Updated on

पालघर - पालघरमधील खाजगी रुग्णालयात डॉक्टरांना शिवीगाळ, कर्मचाऱ्यांना धमकी आणि मारहाणीच्या प्रकरणाने आता चांगलेच न्यायालयीन वळण घेतले आहे. या प्रकरणात अटक असलेले शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल घरत याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने १३ सप्टेंबरपर्यंत (तीन दिवस) वाढ केली आहे. त्याचवेळी शिवसेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने या प्रकरणातील आरोपींच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान पोलिसांच्या संपर्कात न येणाऱ्या अन्य पदाधिकारी यांची धरपकड करण्यासाठी अटकवॉरंट काढण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com