पीटर मुखर्जीचा जामीन पुन्हा नामंजूर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मे 2019

मुंबई - शीना बोरा हत्या खटल्यातील प्रमुख आरोपी पीटर मुखर्जी याला वैद्यकीय कारणांवरून जामीन मंजूर करण्यास उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. ८) नकार दिला. दरम्यान, न्यायालयाने त्याला बायपास शस्त्रक्रियेनंतरच्या उपचारांसाठी खासगी रुग्णालयात जाण्याची परवानगी दिली.

याप्रकरणी तीन वर्षांपासून तुरुंगात असलेला मुखर्जी याच्यावर नुकतीच हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतरच्या उपचारांसाठी जामीन मंजूर करावा, अशा मागणीची याचिका त्याने न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर न्या. रियाझ छागला यांच्यापुढे बुधवारी सुनावणी झाली. वांद्रे येथील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये किमान दोन महिने (२६ सत्रांमध्ये) उपचार घेण्याची आवश्‍यकता वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Court Denies Bail To Peter Mukerjea