esakal | धारावीकरांना कोरोनातून काहीसा दिलासा, केवळ एका रुग्णाची नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

धारावीकरांना कोरोनातून काहीसा दिलासा, केवळ एका रुग्णाची नोंद

एकेकाळी मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पाट ठरलेल्या धारावीमध्ये शुक्रवारी केवळ एका रुग्णाची नव्यानं नोंद झाली आहे.

धारावीकरांना कोरोनातून काहीसा दिलासा, केवळ एका रुग्णाची नोंद

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई:  एकेकाळी मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पाट ठरलेल्या धारावीमध्ये शुक्रवारी केवळ एका रुग्णाची नव्यानं नोंद झाली आहे.  जी उत्तरमध्ये काल 25 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. धारावीमध्ये शुक्रवारी दिवसभरात 1 नवीन रूग्ण सापडले असून एकूण रूग्णसंख्या 3 हजार 716 इतकी झाली आहे.   25 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
 
दादरमध्ये काल केवळ 15 नवीन रुग्ण सापडला असून रुग्णांची एकूण संख्या ही 4 हजार 632  इतकी झाली आहे.  171 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. माहीममध्ये ही शुक्रवारी केवळ 9 नवीन रुग्णांची भर पडली असून रुग्णांची संख्या 4 हजार 404 इतकी झाली आहे.  273 एक्टीव्ह रूग्ण आहेत.

मुंबईतल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

धारावी, दादर, माहिम परिसराचा समावेश असणाऱ्या जी उत्तर विभागात काल 25 नवीन रुग्णांची भर पडली असून रूग्णांचा एकूण आकडा 12 हजार 752 वर पोहोचला आहे. तर 449 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जी उत्तरमध्ये आतापर्यंत 636 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. धारावीमध्ये 3 हजार 380, दादरमध्ये 4 हजार 289 तर माहीममध्ये 3 हजार 988 असे एकूण 11 हजार 657 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबईत शुक्रवारी 813 नवे रुग्ण
 

मुंबईत काल 813 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 2 लाख 84 हजार 502 झाली आहे. काल 14 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 10 हजार 871 वर पोहोचला आहे. काल 1 हजार 25 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2 लाख 59 हजार 137 रूग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 91 टक्के इतका झाला आहे.

अधिक वाचा-  कांजुरमार्गमधील मिठागराच्या जागेवर राज्य सरकारचा अधिकार नाही: केंद्र सरकार

मुंबईत रुग्ण दुपटीचा दर 243 दिवस इतका आहे. 3 डिसेंबरपर्यंत एकूण 19 लाख 55 हजार 342 कोविड चाचण्या करण्यात आल्या. 27 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 0.29 इतका आहे.

--------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Covid 19 Dharavi reports one new cases today

loading image
go to top