पहिला कोविड हॉटस्पॉट असलेल्या वरळी प्रभादेवीमधून कोविड हद्दपार

पहिला कोविड हॉटस्पॉट असलेल्या वरळी प्रभादेवीमधून कोविड हद्दपार

मुंबई: भारतातील पहिला कोविड हॉटस्पॉट असलेल्या वरळी प्रभादेवीच्या वस्त्यांमधून कोविड हद्दपार झाला आहे. जी दक्षिण प्रभागात एकही वस्ती, चाळ सील नाही, अशी माहिती महापालिकेच्या साथ नियंत्रण विभागामार्फत जाहीर करण्यात आली.

वरळी कोळीवाडा हा देशातील पहिला हॉटस्पॉट होता. एप्रिल ते जून या काळात कोळीवाड्यासह परिसरातील वस्त्या संपूर्णपणे सील करण्यात आल्या होत्या. जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर येथील बंधन सैल करण्यात आली. त्यानंतर वरळी बीडीडी आणि ना.म.जोशी मार्ग बीडीडी चाळींमध्ये कोविडचा संसर्ग वाढू लागल्याने या चाळींचा परिसरही काही काळ सील करण्यात आला होता. मात्र, आता या जी दक्षिण प्रभागातील एकही वस्ती किंवा चाळ सील नाही. मात्र या प्रभागातील 108 इमारतींमध्ये कोविडचे रुग्ण सापडले असल्याने ते सील करण्यात आल्या आहेत.

सध्या मुंबईतील 471 वस्त्या चाळी प्रतिबंधित आहेत. 5 हजार 451 इमारती सील आहेत. या प्रतिबंधित क्षेत्र आणि सील इमारतींमध्ये 35 लाख 75 हजार रहिवाशी राहत आहेत. 

वरळी पाठोपाठ धारावी आणि त्यानंतर देवनार गोवंडी एम पूर्व या प्रभागातील कोविडच्या संसर्गाने गंभीर रुप धारण केले होते. मात्र, एम पूर्व प्रभागाच्या वस्त्यांबरोबरच इमारतींमधील कोविडही आता नियंत्रणात आला आहे. या प्रभागात अवघ्या 6 वस्त्या प्रतिबंधित आहेत. तर,15 इमारती सील आहेत.

------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Covid 19 first hotspot mumbai worli Prabhadevi Deportation no building seal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com