
मुंबईत चाचणी झालेल्या पैकी कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा दर 5 टक्क्यांवर आला आहे. एप्रिलपासून आता पर्यंतचा हा सर्वात कमी दर आहे.
मुंबई: मुंबईत चाचणी झालेल्या पैकी कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा दर 5 टक्क्यांवर आला आहे. एप्रिलपासून आता पर्यंतचा हा सर्वात कमी दर आहे, अशी माहिती महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली.
मुंबईत शुक्रवारी 16 हजार 394 नागरिकांच्या चाचण्या झाल्या. त्यातील 825 जणांचे चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. म्हणजे चाचणी झालेल्यांपैकी फक्त 5.03 टक्के व्यक्तींना कोविडची बाधा झाली होती. डिसेंबरच्या पहिल्या दिवसापासून कोविड रुग्ण पॉझिटिव्ह येण्याच्या दरात घट होत आहे, अशी माहिती आयुक्त चहल यांनी दिली. 30 नोव्हेंबर रोजी हा दर 6.48 टक्के होता.तर,1 डिसेंबर रोजी 5.94 टक्क्यांवर आला, असेही आयुक्तांनी नमुद केले.
अधिक वाचा- नेटफ्लिक्सच्या दोन दिवसाच्या विनामूल्य सेवेमुळे OTT प्लॅटफॉर्म्समध्ये वाढणार चुरस
मुंबईत जून महिन्यात कोविड चाचण्या झालेल्या व्यक्तींपैकी दर 18.3 टक्के, जुलै मध्ये 17.9 टक्के ऑगस्ट महिन्यात 14 टक्के होता. मात्र,सप्टेंबर महिन्यात आलेल्या सणांमुळे हा दर पुन्हा 17 टक्क्यां पर्यंत पोहोचला होता. ऑक्टोबर महिन्यापासून मुंबईतील कोविड नियंत्रणात ठेवण्यावर पालिकेला यश आले. ऑक्टोबर महिन्यात हा 11 ते 12 टक्क्यांच्या आसपास होता. तर नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस हा दर 6 ते 7 टक्क्यां पर्यंत आणण्यात महापालिकेला यश आले.
शुक्रवारी मुंबईत 16 हजार 394 चाचण्या झाल्या. त्यातील 8 हजार 869 चाचण्या (RTPCR) पध्दतीच्या होत्या. त्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये झालेल्या 8 हजार 155 चाचण्यांपैकी 7 हजार 551 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले तर 603 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.
मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
सरकारी रुग्णालयात 173 चाचण्या झाल्या त्यापैकी 54 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आणि 113 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. पालिकेने 539 चाचण्या केल्या त्या पैकी 509 जणांचे अहवाल निगेटिव्ह होते आणि 27 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह होते.
महापालिकेने 7 हजार 155 ऍन्टीजेन पध्दतीच्या चाचण्या केल्या. त्यात,113 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 7 हजार 29 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. तर खासगी प्रयोग शाळांमध्ये 372 चाचण्या झाल्या त्यापैकी 28 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आणि 344 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. पालिकेने शुक्रवारी 7 हजार 694 जणांच्या चाचण्या केल्या तर खासगी प्रयोगशाळांमध्ये 8 हजार 527 चाचण्या झाल्या.
दहा दिवसातील कोविड चाचण्याची परिस्थिती
दिवस | चाचण्या | पॉझिटिव्ह | प्रमाण (टक्क्यात) |
25 ऑक्टोबर | 19018 | 1272 | 6.69 |
26 ऑक्टोबर | 17973 | 1167 | 6.49 |
27 ऑक्टोबर | 16902 | 1136 | 6.72 |
28 ऑक्टोबर | 14592 | 922 | 6.32 |
30 ऑक्टोबर | 11706 | 758 | 6.48 |
1 डिसेंबर | 16150 | 960 | 5.94 |
2 डिसेंबर | 15399 | 880 | 5.71 |
3 डिसेंबर | 15832 | 823 | 5.20 |
4 डिसेंबर | 16394 | 825 | 5.03 |
----------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Covid 19 positivity Rate lowest since April at 5 per cent