कोविडचा रिकव्हरी रेट घटला, 11 दिवसात 2 टक्‍क्‍यांनी घट

समीर सुर्वे
Sunday, 13 September 2020

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवसात रिकव्हरी दरात 2 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. तर,उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्येमध्येही 2 टक्‍क्‍यांहून अधिक वाढ झाली आहे.

मुंबई: मुंबईत पुन्हा एकदा कोविड फास आवळू लागला आहे. फक्त रुग्णच वाढत नसून कोविडवर मात करणाऱ्या रुग्णांची संख्याही घटू लागली आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवसात रिकव्हरी दरात 2 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे.  उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्येमध्येही 2 टक्‍क्‍यांहून अधिक वाढ झाली आहे.

मुंबईत 31 ऑगस्टपर्यंत 1 लाख 45 हजार 805 रुग्णांची नोंद होती. तर,तेव्हा फक्त 20 हजार 554 रुग्णांवर उपचार सुरु होते. म्हणजे एकूण रुग्णांच्या 14.09 टक्के रुग्णांवर उपचार सुरु होते. तर,शुक्रवारी म्हणजेच 11 तारखेपर्यंत 1 लाख 65 हजार 278 रुग्णांची नोंद झाली आहे. 27 हजार 626 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. म्हणजे 16.71 टक्के रुग्ण हे ऍक्‍टिव्ह आहेत. मात्र,यात लक्षण विरहीत रुग्णांचे प्रमाण हे 68 टक्के आहे. लक्षण असलेले रुग्ण 27 टक्के असून अत्यावस्थ रुग्णांचे प्रमाण 5 टक्के असल्याची माहिती महापालिकेनं दिली आहे. साधारण 15 ऑगस्टनंतर अॅक्‍टिव्ह रुग्णांची संख्या कमी होत होती. मात्र, सप्टेंबरच्या पहिल्या दिवसापासून पुन्हा ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.

रिकव्हरी दरही सप्टेंबरच्या पहिल्या 12 दिवसात 2 टक्‍क्‍यांनी घटला आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत रिकव्हरी रेट म्हणजे कोविडवर मात केलेल्या रुग्णांचे प्रमाण 80 टक्के होते. ते,11 सप्टेंबरला 78 टक्‍क्‍यांवर आले आहे.

शुक्रवारपर्यंत सर्वाधिक रुग्णांची नोंद बोरिवली आर मध्ये प्रभागात 9864 एवढी झाली आहे. त्या खालोखाल मालाड पी उत्तर प्रभागात 9824 रुग्ण आतापर्यंत नोंदविण्यात आले आहे. अंधेरी पूर्व के पूर्व 9793 आणि के पश्‍चिम अंधेरी पश्‍चिम येथे 9485 आणि जी उत्तर दादर माहिम धारावीत 9137 रुग्णांची नोंद झाली आहे.
 
31 ऑगस्ट
एकूण रुग्ण - 1,45,805
कोविडवर मात केलेले -117268
ऍक्‍टिव्ह रुग्ण - 20554
 
11 सप्टेबर
एकूण रुग्ण - 165278
कोविडवर मात केलेले - 129244
ऍक्‍टिव्ह रुग्ण - 27626

----------

(संपादनः पूजा विचारे) 

Covid 19 recovery rate fell down 2 percentage in 11 days


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid 19 recovery rate fell down 2 percentage in 11 days