पहिली ते आठवीपर्यंतच्या वार्षिक परीक्षा रद्द, नववी आणि अकरावीच्या परीक्षा 'या' तारखेनंतर

पहिली ते आठवीपर्यंतच्या वार्षिक परीक्षा रद्द, नववी आणि अकरावीच्या परीक्षा 'या' तारखेनंतर

मुंबई - महाराष्ट्रात दररोज कोरोनाचा आकडा वाढताना पाहायला मिळतोय. अशात आज समोर आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ५२ वर गेलाय. महाराष्ट्रात कोरोना सध्या स्टेज २ वर आहे. अशात महाराष्ट्रात कोरोना स्टेज २ मधून ३ मध्ये गेला तर महाराष्ट्रात मात्र परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते.

म्हणूनच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अत्यंत महत्त्वाची घोषणा केली. मुंबई महानगर रिजन, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपुरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद राहणार असल्याचं घोषित केलंय. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षांसंदर्भात देखील मोठी घोषणा केलीये. 

महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभागाची आज बैठक बोलावली होती. या बैठकीत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या वार्षिक परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर इयत्ता नववी आणि अकरावीच्या परीक्षा एप्रिलनंतर घेण्याचा निर्णय घेतला गेला  आहे. याबाबत पत्रकार परिषद घेत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिलीये.

दहावीच्या परीक्षा वेळापत्रकाप्रमाणेच होणार असल्याचं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलंय. राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना घरी बसून काम करण्याची परवानगी देण्यात आलीये. त्यामुळे महाराष्ट्रात राज्य बोर्डाच्या शाळा 100 टक्के  बंद राहणार आहेत. महाराष्ट्रावर सध्या कोरोनाचं सावट आहे आणि म्हणूनच राज्य सरकारकडून शालेय शिक्षणाबद्दल मोठा निर्णय घेतला गेलाय. 

कोरोनाचा प्रसार होत असल्यानं राज्यातील परिस्थिती संवेदनशील होत चालली आहे. पुणे, मुंबईसह  राज्यातील नागरिकांनी घराबाहेर जाणं टाळावं असं वारंवार सांगितलं जातंय. याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून हे मोठं पाऊल उचललं गेलंय. 

covid 19 threat exams from standard first to eighth cancelled by maharashtra state education board

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com