
मुंबईतील आणखी प्रमुख 29 खासगी रुग्णालयांना कोरोनाची लस देण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मुंबई: मुंबईकरांना कोरोनाची लस घेणे आता आणखी सोपे होणार आहे. कारण, मुंबईतील आणखी प्रमुख 29 खासगी रुग्णालयांना कोरोनाची लस देण्याची परवानगी देण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून ही परवानगी मिळाली असून लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी यातून टाळता येऊ शकेल.
गेल्या दोन दिवसांपासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. ज्यात ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. मात्र, गेले दोन्ही दिवस लसीकरण केंद्रावर मोठ्याप्रमाणात गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
गुरुवारपासून होणार सुरुवात
बॉम्बे रूग्णालयाचे सल्लागार चिकित्सक आणि खासगी रुग्णालयांचे समन्वयक डॉ. गौतम भन्साळी यांनी सांगितले की, गुरुवारपासून 29 खासगी रुग्णालयांची नावे कोविन पोर्टलवर उपलब्ध असतील. काल संपूर्ण प्रक्रिया झाली आहे. लाभार्थी त्यांच्या इच्छेनुसार संबंधित रुग्णालयाची निवड करुन कोविन पोर्टलवर नोंदणी करू शकतात, आणि लस घेऊ शकतात.
हेही वाचा- ''कांजुरमार्ग येथे मेट्रो कारशेडच्या कामासाठी परवानगी द्या''
तसेच, संस्थाद्वारे व्यवस्थापित रुग्णालयांना लस देण्याची परवानगी द्यावी, यासाठी राज्य सरकारने केंद्राला आवाहन केले आहे. जेणेकरून ते कमीतकमी मुदतीत योग्यप्रकारे या लसीकरण प्रक्रियेत सहभागी होतील.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (एमजेपीजेवाय) आणि केंद्र सरकारच्या आरोग्य सेवा (सीजीएचएस) योजनेंतर्गत बरीच रूग्णालये येत नाहीत आणि यामुळे लसीकरण मोहिमेच्या सध्याच्या टप्प्यावर परिणाम झाला, परिणामी ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील तसंच इतर सहव्याधींनी त्रस्त लोकांना त्रास सहन करावा लागतोय.
मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
महाराष्ट्र सरकारची प्रमुख आरोग्य विमा प्रणाली असलेल्या एमजेपीजेवाय अंतर्गत समाविष्ट असलेल्या 1000 रूग्णालयात कोविड लसीकरण सुरू करण्यात आले आहे. आधीच 50 रूग्णालयात लसीकरण सुरू झाले आहे, तर इतर ठिकाणी लस पुरवठा आणि कर्मचार्यांना प्रशिक्षण आयोजित केले जात आहे.
खासगी रुग्णालयांची यादी
- सुश्रुषा रुग्णालय अँड रिसर्च सेंटर, विक्रोळी
- के.जे सोमैया रुग्णालय अँड रिसर्च सेंटर
- बालाभाई नानावटी रुग्णालय
- वोक्हार्ट रुग्णालय
- सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय
- सैफी रुग्णालय
- पीडी हिंदुजा रुग्णालय आणि एमआरसी
- डॉ. एल.एच.एच. हिरानंदानी रुग्णालय
- कौशल्य मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट
- मसिना रुग्णालय
- होली फॅमिली रुग्णालय
- एसएल रहेजा रुग्णालय
- लीलावती रुग्णालये आणि वैद्यकीय संशोधन केंद्र
- गुरु नानक रुग्णालय
- बॉम्बे रुग्णालय
- ब्रीच कँडी रुग्णालय
- फोर्टिस, मुलुंड रुग्णालय
- भाटिया जनरल रुग्णालय
- ग्लोबल रुग्णालय
- सर्वोदय रुग्णालय
- जसलोक रुग्णालय
- करुणा रुग्णालय
- एच जे दोशी घाटकोपर हिंदुआ सभा रुग्णालय
- एसआरसीसी मुलांचे रुग्णालय
- कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालय
- कॉनवेस्ट व मंजुला एस बदाणी जैन रुग्णालय
- सुराणा सेठीया रुग्णालय
- होली स्पिरीट रुग्णालय
- टाटा रुग्णालय
--------------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Covid-19 vaccination 29 more private hospitals Here the complete list