esakal | कोविड सेंटर, रुग्णालयात डॉक्टर्स, रुग्णांची दिवाळी! कोरोना रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद देण्याचा प्रयत्न
sakal

बोलून बातमी शोधा

कोविड सेंटर, रुग्णालयात डॉक्टर्स, रुग्णांची दिवाळी! कोरोना रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद देण्याचा प्रयत्न

दिवाळीचा आनंद रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना रूग्णांच्या चेहऱ्यावरही त्यांच्या घरापासून आणि त्यांच्या नातेवाईकांपासून दूर असून ही पाहायला मिळाला.

कोविड सेंटर, रुग्णालयात डॉक्टर्स, रुग्णांची दिवाळी! कोरोना रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद देण्याचा प्रयत्न

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई: दिवाळीचा आनंद रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना रूग्णांच्या चेहऱ्यावरही त्यांच्या घरापासून आणि त्यांच्या नातेवाईकांपासून दूर असून ही पाहायला मिळाला. पालिकेच्या बीकेसी कोविड केंद्रात दिवाळीनिमित्त रुग्णांना मिठाई, चकली आणि शंकरपाळीचे वाटप करण्यात आले. रूग्णांवर उपचार करणार्या डॉक्टरांनी रुग्णांसह दिवाळी साजरी केली. 

प्रत्येकास कोरोनाने संक्रमित झालेल्या व्यक्तीपासुन अनेक जण दूरावले आहेत. कारण, त्याच्या संपर्कात येणारे अन्य लोक देखील संक्रमित होऊ शकतात. त्यामुळे, रुग्णांना रूग्णालयात एकटे रहावे लागते. अशा परिस्थितीत, त्यांच्या एकटेपणा, ताणतणाव आणि चिंता यावर मात करण्यासाठी पालिकेने एक स्मार्ट फोनची व्यवस्था केली आहे. जेणेकरून तो आपल्या घरच्यांशी बोलू शकेल. तणावमुक्त होण्यासाठी समुपदेशनाचीही व्यवस्था केली आहे. 

रिपब्लिक टीव्हीच्या वार्तांकनाने न्यायालयाचा अवमान? संस्थेला कायदेशीर नोटीस

प्रत्येकाला उत्सव आपल्या कुटुंबियांसोबत साजरा करायचा आहे. परंतु कोरोना संक्रमित रुग्ण ते करू शकत नाही. अशा परिस्थितीत त्यांना आनंदी करण्यासाठी बीकेसी जंबो कोविड केअर केंद्र येथे रूग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मिठाई, चकली आणि इतर खाद्यपदार्थांचे वाटप पालिकेने केले. 

बीकेसी कोविड केअर केंद्राचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे म्हणाले की आम्ही 400 रूग्णांना खाद्यपदार्थांचे 
वाटप केले. मी रात्रंदिवस रूग्णांच्या उपचारांमध्ये गुंतलेल्या डॉक्टर, परिचारिका व इतर कामगारांना माझ्या वतीने खाद्यपदार्थ दिले. अशा प्रकारे आम्ही आमची दिवाळी रुग्णांसह साजरी केली. 

काय सांगता! कोविडची दुसरी लाट फेब्रुवारीत? राज्य आरोग्य विभागाचा अंदाज - 

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (आरोग्य) सुरेश काकाणी यांनी सांगितले की, ' अनेक रुग्णालयांमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिवाळीनिमित्त रुग्णांना भोजन वाटप करण्यात आले. बरेच रुग्ण मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर आजारांनी ग्रस्त आहेत, त्यामुळे दिवाळी रुग्णाच्या आरोग्यास डोळ्यासमोर ठेवून साजरी केली गेली. रुग्णालये आणि कोविड केअर केंद्र ही कर्मचार्‍यांनी सजवले होते. काही केंद्रांमध्ये हळू आवाजात संगीतही वाजवले गेले.

covid Center, Doctors at the Hospital, Patients Diwali Corona tries to put joy on the patients face

---------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )