राज्यातील कोव्हिड सेंटर्स भ्रष्ट्राचाराचे कुरण; देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत घणाघात

सकाळ न्यूज नेटवर्क 
Tuesday, 8 September 2020

सरकारने सुरू केलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये झालेले भ्रष्ट्राचार म्हणचे प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार असल्याची गंभीर  टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुंबई - कोरोनाच्या काळात सुरू झालेल्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनेक विषयांवर राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे.राज्यात आज मोठ्या संख्येन कोरोनाचे आकडे वाढत आहे. राज्यात सुरुवातीपासून कोरोनाशी नाही तर आकडेवारीशी आपली लढाई केली. आकडे कसे लपविता येतील. याचाच प्रयत्न सरकारने केला. सरकारने सुरू केलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये झालेले भ्रष्ट्राचार म्हणचे प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार असल्याची गंभीर  टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

ड्रग्स प्रकरणी एनसीबीची मोठी कारवाई, अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक
 

एका मराठी वृत्त वाहिनीच्या पत्रकाराला अटक करणे चूक असल्याचेही त्यांनी म्हटले, तसेच हिंदी वृत्तवाहिनीच्या संपादकावर अरेरावीची भाषा करण्याच्या आरोपांमुळे हक्कभंग आणण्यात आला, तर हाच नियम दै सामनाला का नाही लावला जात असा सवाल त्यांनी विधानसभेत विचारला. दै सामनातून ज्या प्रकारे पंतप्रधान आणि राज्यपालांबाबत भाषा वापरली जाते त्याचा त्यांनी यानिमित्ताने समाचार घेतला. राज्यात कोरोनासंसर्ग आटोक्यात आणण्यासाठी उभारण्यात आलेले कोव्हिड सेंटर्स भ्रष्ट्राचाराचे कुरण झाले असल्याचा आरोपही फडणवीसांनी केला.

----------------------------------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid Centers in the state are a breeding ground for corruption; Devendra Fadnavis in the assembly