कोविड सेंटर भ्रष्टाचाराचे कुरण, नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी; भाजपचा गंभीर आरोप

covid center
covid center

मुंबई: कोरोनाच्या प्रतिबंधासाठी उभारण्यात आलेले कोरोना केअर सेंटर हे भ्रष्टाचाराचे कुरण ठरले असून, तेथे मुंबईतील करदात्या नागरिकांच्या पैशांची उधळपट्टीच नव्हे, तर लूट चालली आहे, असा गंभीर आरोप भाजपने केले आहे. या प्रकरणी आयुक्तांना पत्र देऊन, लोकायुक्तांकडे दाद मागण्यात येणार आहे, असे भाजपचे पालिकेतील पक्षनेते विनोद मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी पालिकेती पक्षनेते विनोद मिश्रा, गटनेते प्रभाकर शिंदे आणि मुलुंडचे आमदार मिहीर विनोद कोटेचा उपस्थित होते. विनोद मिश्रा म्हणाले की, विविध ठिकाणी उभारण्यात आलेली कोविड सेंटर निरुपयोगी ठरली आहेत. त्यांच्या बांधकामावर अमाप पैसा खर्च झाला आहे. पण त्याचा रुग्णांना उपयोग काय होतो? बीकेसीतील २००० पैकी २०० बेडचा उपयोग होत आहे. 

नेस्कोतील ३३०० बेडपैकी ३०० चा उपयोग होत आहे. मात्र इतर बेडसाठी असलेले साहित्य म्हणजे कॉन्ट्रॅक्टरची धन होत आहे. बाजारात किरकोळ  खरेदीत मिळणाऱ्या किमतीपेक्षाही कितीतरी ज्यादा पटीने ठेकेदाराला भाड्यापोटी रक्कम देण्यात येत आहे. पुन्हा हा ठेकेदार कोण, तर ज्याचा वैद्यकीय वस्तू पुरवठ्याशी काहीही संबंध नाही , असे बांधकाम क्षेत्रातील एका बिल्डरला हे कॉन्ट्रॅक्ट दिल्याचा आरोप विनोद मिश्रा यांनी केला. 
 
पंखे ५० लाखांना विकत मिळाले असते, तेथे १ कोटी ८० लाख भाडे देण्यात येणार आहे. या व्यवहारात १ कोटी ३० लाखांची उधळपट्टी आहे. बेड ४० लाखांना मिळाले असते, तर त्यासाठी  १ कोटी ८० लाख  खर्ची घालण्यात आले आहेत. ऑक्सिजन सिलिंडरमध्येही मोठा भ्रष्टाचार असल्याचे मिश्रा म्हणाले.  नेस्कोतील कोविड सेंटरसाठी रोमेल बिल्डर याला १० कोटी ८० लाखांची वर्कऑर्डर देण्यात आली आणि त्यापैकी ५.५० कोटी त्यांना अॅडव्हान्सही देण्यात आले. कोविड सेंटरचे काम देताना पॅनेलवरचे डेकोरेटर का घेण्यात आले नाहीत, असा प्रश्नही कोटेचा यांनी उपस्थित केला आहे. 

आंदोलनाचा इशारा:

 पालिकेत चाललेल्या भ्रष्टाचारप्रकरणी आपण आयुक्तांच्या आणि महापौरांच्या दालनाबाहेर मूक निदर्शने केली. आता कोविड सेंटरमधील उधळपट्टीबाबत आयुक्तांना पत्र देण्यात येणार आहे. त्यानंतर लोकायुक्तांकडे दाद मागण्यात येणार असल्याचे मिश्रा आणि कोटेचा यांना सांगितले.

covid centre means wastage of money said bjp 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com