मुंबईत 22 टक्के हॉटेल्सला टाळे  कोव्हिडचा फटका; आस्थापनांची संख्या 4802 ने कमी 

मुंबईत 22 टक्के हॉटेल्सला टाळे  कोव्हिडचा फटका; आस्थापनांची संख्या 4802 ने कमी 

मुंबई  : कोव्हिडचा फटका मुंबईतील प्रत्येक व्यवसायाला बसला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल 22 टक्के हॉटेल, उपाहारगृहांना टाळे लागले आहे. व्यावसायिक आस्थापनांची संख्याही 4802 ने कमी झाली आहे. याचा थेट परिणाम रोजगारावर झाल्याचे स्पष्ट आहे. 

महानगरपालिकेच्या वार्षिक प्रकाशनातील नोंदीनुसार जानेवारी 2020 मध्ये 12,100 उपाहारगृह, निवासी हॉटेल्सची नोंद होती, तर जानेवारी 2021 मध्ये ही संख्या 9425 वर आली आहे. लॉकडाऊनमध्ये तब्बल 2675 उपाहारगृह आणि हॉटेलना टाळी लागली आहेत, तर जानेवारी 2020 मध्ये 1 लाख 49 हजार 638 विविध व्यवसायांची नोंद होती. जानेवारी 2021 मध्ये ही संख्या 1 लाख 44 हजार 836 वर आली आहे. या वर्षाच्या काळात 4802 व्यावसायिक आस्थापने बंद झाली आहेत. महापालिकेच्या दुकाने आस्थापना विभागामार्फत वितरीत करण्यात येणाऱ्या विविध परवान्यांच्या आधारे ही नोंद वार्षिक प्रकाशनात प्रसिद्ध केली आहे. 

मोठे दुकानदार, रिटेलना फटका 
दुकानांची संख्या या काळात वाढली आहे. 2020 मध्ये मुंबईत 1 लाख 460 हजार दुकानांची नोंद होती, तर जानेवारी 2021 मध्ये 1 लाख 7 हजार 256 वर पोहचली आहे; मात्र यात दहा आणि त्यापेक्षा जास्त कामगार असलेल्या दुकानांची संख्या 14 हजार 438 वरून 12 हजार 21वर आली आहे. यात मॉलमधील अनेक रिटेल शॉपचा समावेश आहे. नऊपर्यंत कामगार असलेल्या दुकानांची संख्या 9210 ने वाढली आहे. अशा दुकानांची संख्या 86 हजार 22 वरून 95 हजार 235 वर आली आहे. 

लॉकडाऊनचा परिणाम सर्वाधिक नव्या हॉटल व्यावसायिकांवर झाला आहे. लॉकडाऊनपूर्वी एक-दोन वर्ष व्यवसाय सुरू करणाऱ्यांना जास्त फटका बसला आहे. यात तरुणांची संख्या जास्त आहे; मात्र हा फक्त व्यावसायिकांना नाही तर तेथे काम करत असलेले कामगार आणि हॉटेलवर अवलंबून असलेल्या इतर व्यवसायांनाही याची झळ बसली आहे. 
- निरंजन शेट्‌टी,
उपाध्यक्ष, आहार संघटना 

Covid hits 22 percent of hotels in Mumbai The number of establishments decreased by 4802

-----------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com