
- वाहन उद्योगावर कोरोनाची छाया कायम
- जुलैमध्ये टॅक्टर वगळता, सर्व सेगमेंटमधील वाहनांची नोंदणी घटली
- ट्रॅक्टर्सच्या नोंदणी 37.24 टक्के वाढ, विक्रीत महाराष्ट्र अव्वल
- ऑगस्ट महिन्यात परिस्थिती सुधारण्याची आशा
कोव्हिडमुळे वाहन उद्योगाला मोठा फटका! व्यवसायात जुलैमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत मोठी घट
मुंबई : कोव्हिड 19 संसर्गामुळे देशात जुलै महिन्यात वाहन नोंदणीला मोठा फटका बसला आहे. ट्रॅक्टर वगऴता इतर सर्व सेगमेंटमधील वाहन रजीस्ट्रेशनमद्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत जुलै महिन्यात 37 ते 75 टक्क्यापर्यंत घट झाल्याचे चित्र आहे. जून महिन्याच्या तुलनेत ही परिस्थिती थोडीफार सुधारली आहे. सर्व सेगमेंटमध्ये वाहन विक्री कमी होत असतांना ट्रॅक्टरच्या विक्रीत 37.24 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे ट्रॅक्टर खरेदीत महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसीएशन (फाडा) ने ही माहिती दिली आहे. ऑगस्ट महिन्यात वाहन विक्रीचे चित्र थोडेफार आशादायी असण्याचा अंदाजही या अहवालात व्यक्त केला गेलाय.
लॉकडाऊनमध्येही रेल्वे सुसाट ! कमावला 'इतक्या' कोटींचा महसूल
कोरोनामुळे फटका बसलेला वाहन मार्केट अजूनही जाग्यावर आलेल नाही. रस्ते वाहतूक , महामार्ग विभागाकडे जुलै महिन्यात नोंदवण्यात आलेल्या दुचाकी, तीन चाकी, व्यावसायिक, प्रवासी वाहनांच्या संख्येवरुन हे लक्षात येतय. चांगला पाऊस पडल्यामुळे शहराच्या तुलनेत ग्रामिण भागात टू व्हिलर, थ्रि व्हिलर आणि ट्रॅक्टरच्या विक्रीत चांगली वाढ नोंदवली गेली आहे. ज्या राज्यांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्या राज्यांमध्ये वाहन नोंदणीचे प्रमाण घसरले आहे. केंद्र सरकारने जाहिर केलेल्या पतपुरवठा धोरणाचा हवा तेवढा फायदा वाहन क्षेत्राला होत नसल्याचे रिटेलर्सचे म्हणणे आहे.
ऑगस्टमध्ये विक्री वाढणार
ऑगस्ट महिन्यात गणेश चतुर्शी आणि ओनम उस्तव सुरु होत असल्यामुळे वाहन विक्रीत सकारात्मक वाढ होणार आहे. त्यामुळे वाहन बाजारात थोडी फार गती येईल असा अंदाज या अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे.
ट्रॅक्टर खरेदी वाढली, महाराष्ट्र अव्वल
देशात गेल्या वर्षीच्या तुलनेत या महिन्यात सर्वाधिक ट्रॅक्टर खरेदीची नोंद महाराष्ट्रात करण्यात आली आहे. महाराष्ट्रात गेल्या वर्षी जुलै महिन्यात 4,073 ट्रॅक्टरची नोंदणी झाली होती. मात्र या वर्षी जुलै महिन्यात 8,988 ट्रॅक्टर्सची नोंदणी झाली आहे. म्हणजे जवळपास 120 टक्क्याने वाढ झाली आहे. तर पंजाब,गुजरात, झारखंड , कर्नाटक, तामिळनाडू या राज्यात ट्रॅक्टरच्या नोंदणीत 35 ते 110 टक्क्यापर्यंत वाढ नोंदवली गेली आहे.तर जम्मू काश्मीरमध्ये केवळ 5 ट्रॅक्टरची नोंदणी झाली आहे.
रायगड जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राला मोठा फटका; उत्पादन क्षमतेत झालीये इतकी घट...
जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात वाहन नोंदणीत सकारात्मक वाढ झाली आहे. मात्र अजूनही वाहन उद्योग व्यवस्थित जाग्यावर आलेले नाही. केंद्राच्या पतपुरवठा धोरणाचा वाहन उद्योगाला हवा तसा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे केंद्र सरकारने यावर विचार करावा
आशिष काळे, अध्यक्ष फाडा
जुलै महिन्यातील वाहन नोंदणी
टू व्हिलर
जुलै 2020 | 8,74,638 |
जुलै 2019 | 13,98,702 |
वाहन नोंदणीतील घट | 37.47 टक्के |
.थ्री व्हिलर
जुलै 2020 | 15,132 |
जुलै 2019 | 58,940 |
वाहन नोंदणीतील घट | 74.33 टक्के |
व्यावसायिक वाहन
जुलै 2020 | 19,293 |
जुलै 2019 | 69,338 |
वाहन नोंदणीतील घट | 72.18 टक्के |
प्रवासी वाहने
जुलै 2020 | 1,57,373 |
जुलै 2019 | 2,10,377 |
वाहन नोंदणीतील घट | 25.19 टक्के |
ट्रक्टर्स
जुलै 2020 | 76,197 |
जुलै 2019 | 55,522 |
वाहन नोंदणीतील वाढ | 37.24 टक्के |
....
जुलै 2020 - एवढ्या वाहनांची नोंद झाली - 11,42,633
जुलै 2019- 17,92,879 ( 36.27 ने कमी ))
टू व्हिलर वाहनांची नोंदणी
कंपनी |
जुलै 20 | जुलै 19 |
हिरो मोटरकॉर्प- | 3,55,595 | 4,98,050 |
होंडा मोटरसायकल | 2,01,432 | 3,56,823 |
टिव्हीएस मोटर | 1,24,144 | 2,10,846 |
बजाज ऑटो | 93,371 | 1,68,554 |
रॉयल इनफील्ड | 34,313 | 50,420 |
इंडीया यामाहा | 32,819 | 52,043 |
तिन चाकी वाहन नोंदणी
कंपनी | जुलै 20 | जुलै 19 |
बजाज ऑटो | 5,627 | 28,237 |
पॅजीओ | 3075 | 11,298 |
टिव्हीएस | 389 | 1024 |
व्यावसायिक वाहने
कंपनी | जुलै 20 | जुलै 19 |
महिंद्रा | 8,930 | 17,158 |
टाटा मोटर्स | 4,058 | 27,811 |
अशोक लेलँड | 1619 | 11,459 |
मारुती सुझुकी | 1,374 | 2202 |
एकुण वाहने | 19,293 | 69,338 |
प्रवासी वाहने
कंपनी |
जुलै 20 | जुलै 19 |
मारुती सुझुकी | 79,315 | 99,381 |
हुंडाई | 29,413 | 38,556 |
टाटा मोटर्स | 12,753 | 12,760 |
महिंद्रा | 7811 | 17,823 |
रेनॉल्ट | 4997 | 4293 |
टोयाटा किर्लोस्कर | 4396 | 9991 |
फोर्ड इंडीया | 3213 | 5687 |
होंडा कार | 3,303 | 10,763 |
ट्रॅक्टर
कंपनी | जुलै 20 | जुलै 19 |
महिंद्रा (ट्रॅक्टर) | 18,607 | 13,399 |
महिद्रा ( स्वराज ) | 12,249 | 8,290 |
टॅफे | 9,579 | 6500 |
इस्कॉर्ट | 8781 | 5988 |
आयशर | 4,969 | 4,038 |
इतर कंपन्या |
महाराष्ट्रात जुलै (2020) महिना एवढ्या नवीन वाहनांची नोंदणी
टू व्हिलर- 70,690 (जुलै 2019- 1,20,839) (घट- 41.50 टक्के)
थ्री व्हिलर- 1,506 (जुलै 2019- 7998) (घट- 81.17 टक्के)
व्यावसायिक वाहने- 2,317 (जुलै 2019 - 9212) ( घट- 78.85 टक्के)
प्रवासी वाहने- 16,149 (जुलै 2019- 22,155 )) (घट- 27.11 टक्के)
ट्रॅक्टर्स- 8,988 (जुलै-2019- 4,073)) (वाढ- 120.67 टक्के)
एकुण- 99,650 (जुलै 2019 -1,64,277)) (घट- 39.34 टक्के)
-----------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )