भिवंडीतील सवाद येथे सुसज्ज कोव्हिड रुग्णालय; पालकमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी 

भिवंडीतील सवाद येथे सुसज्ज कोव्हिड रुग्णालय; पालकमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी 

भिवंडी ः कोव्हिडसह अन्य आजारावर उपचार करण्यासाठी भिवंडीतील सवाद गाव येथे जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून उभारण्यात आलेले अद्ययावत रुग्णालय भविष्यात ग्रामीण भागातील नागरिकांसाठी उपयुक्त असे वरदान ठरणार आहे, अशी माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यावेळी शिंदे यांनी कोव्हिड रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी आमदार शांताराम मोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार व अधिकारी उपस्थित होते. 

भिवंडी तालुक्‍यातील सवाद ग्रामपंचायत क्षेत्रात ठाणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर, डॉ. मोहन नळदकर यांच्या परिश्रमाने तब्बल 2 लाख 30 हजार चौरस फुटांचे अद्ययावत सुसज्ज असे 818 बेडचे जिल्हा कोव्हिड रुग्णालय तयार झाले आहे. सध्या कोरोना आटोक्‍यात असला तरी हिवाळ्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यास सज्ज राहण्यासाठी सरकारी स्तरावर योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. या रुग्णालयात पुरुष व महिलांकरीता स्वतंत्र प्रत्येकी 360 बेडसह 80 बेडचे अद्ययावत आयसीयू तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या रुग्णालयात शौचालयात देखील ऑक्‍सिजन सुविधा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली

Covid Hospital at Savad in Bhiwandi Inspection by Guardian Minister Eknath Shinde

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com