esakal | कोविड रुग्णालयांंवर तब्बल इतक्या कोटींचा खर्च; वाचा 'एमएमआरडीए' प्रशासनाची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

कोविड रुग्णालयांंवर तब्बल इतक्या कोटींचा खर्च; वाचा  'एमएमआरडीए' प्रशासनाची माहिती

एमएमआरडीए प्रशासनाने कोविड19 अंतर्गत बांधलेल्या रुग्णालयावर तीन महिन्यात  किती कोटी रुपये खर्च झाले याची माहिती दिली आहे.

कोविड रुग्णालयांंवर तब्बल इतक्या कोटींचा खर्च; वाचा 'एमएमआरडीए' प्रशासनाची माहिती

sakal_logo
By
मिलिंद तांबे - सकाळ वृत्तसेवा


मुंबई : मुंबईत कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावानंतर बेड मिळणे अशक्य झाले होते. अश्यावेळी एमएमआरडीए प्रशासनाने कोविड19 अंतर्गत बांधलेल्या रुग्णालयावर तीन महिन्यात तब्बल 53 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती दिली आहे. प्रत्येक बेड मागे 25 हजार रुपये खर्च झाला असून 2118 बेड तयार करण्यात आले आहेत. एमएमआरडीए ने आरटीआय मध्ये ही माहिती दिली आहे.

विकास दुबेच्या एन्काउंटरवर एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा म्हणतात, हा एन्काउंटर तर...

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीए प्रशासनाकडे कोविड 19 अंतर्गत बांधलेल्या टप्पा 1 आणि टप्पा 2 मधील रुग्णालयाची विविध माहिती विचारली होती. अनिल गलगली यांस उपलब्ध करुन देण्यात आलेल्या माहितीच्या अनुसार  एकूण 53 कोटी खर्च करण्यात आला आहे. टप्पा 1 मध्ये सिव्हील आणि इलेक्ट्रिकल यावर 14 कोटी 21 लाख 53 हजार 825 रुपये इतका खर्च झाला आहे तर द्वितीय चरणात 21 कोटी 55 लाख 25 हजार 353 रुपये खर्च झाला आहे. दोन्ही चरणात बेड संख्या ही 1059 असे एकूण 2118 अशी आहे. प्रथम टप्प्यात उपकरण आणि साहित्यावर 5 कोटी 26 लाख 47 हजार 406 रुपये खर्च करण्यात आले असून द्वितीय टप्प्यात 12 कोटी 6 लाख 33 हजार 259 रुपये खर्च करण्यात आले आहे.  या सुविधांत ऑक्सिजन, आयसीयू, डायलिसिस, ट्रायेज यांचा समावेश आहे.

ठाणे मृतदेह अदलाबदली प्रकरणी मोठी कारवाई, आयुक्तांची दिलगिरी

     कोविड 19 अंतर्गत खरेदी, कामे आणि सेवा आपत्कालीन परिस्थिती व तातडीची निकड असल्याने उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचा शासन निर्णय तसेच विशेष परिस्थिती व तातडीची खरेदी यानुसार केंद्र शासनाच्या अर्थ विभागाने निश्चित केलेल्या तरतुदीनुसार करण्यात आली आहे. अनिल गलगली यांच्या मते भलेही निविदा काढल्या नसल्या तरी एमएमआरडीए प्रशासनाने सर्व खर्चाची माहिती अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे जेणेकरुन कोणालाही याचे निरीक्षण करणे सहज शक्य होईल.

-----------------------------


कोट्यवधी रुपये खर्चून कोव्हिड केंद्र उभे करण्यात येत असले तरी अनेक ठिकाणी रुग्णांना बेड विळत नाहीत. त्यामुळे बेडसह संपूर्ण खर्चाची इतंभूत माहिती एमएमआरडीए प्रशासनाने लोकांसाठी उपलब्ध करणे गरजेचे आहे.

अनिल गलगली , आरटीआय कार्यकर्ते

----------------------------------------------------------------

(संपादन - तुषार सोनवणे

loading image