Big News - नवी मुंबईतील रुग्णसंख्या 2 हजार पार...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 30 May 2020

114 नव्या रुग्णांची भर ; 7 जणांचा मृत्यू

नवी मुंबई : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत शनिवारी 114 नव्या रुग्णांची भर पडली. नव्या रुग्णांमुळे नवी मुंबईतील कोरोनाबधित रुग्णांच्या संख्येने 2 हजारांचा पल्ला पार केला आहे.  शनिवारी मिळालेल्या अहवालानुसार 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 7 जणांमध्ये 5 महिला आणि दोन ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या महिला आणि पुरुषांपैकी काही जणांना आधीपासूनच विविध आजाराने ग्रासले होते. या सात जणांमुळे मृतांची एकूण संख्या 70 झाली आहे.

मोठी बातमी - खासगी डॉक्टर्सना देखील मिळणार 'हे' संरक्षण, आता तरी खासगी डॉक्टर्स सेवा देणार का ?

नव्या 114 रुग्णांमुळे शहरातील एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या 2 हजार 110 एवढी झाली आहे. शनिवारी 90 नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्या एक हजार 248 नागरिकांना घरी पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या महापालिकेच्या रुग्णालयात 792 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आयुर्वेदिक औषधोपचार करण्यास परवानगी

कोरोना महामारीविरोधात संपूर्ण जग लढत असले, तरी अद्याप कोणतेही प्रभावी औषध अथवा लस सापडलेली नाही. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, हा एकच पर्याय आहे. त्याबाबत सरकारने नेमलेल्या समितीने कोरोना रुग्णांवर होमिओपॅथिक, युनानी व आयुर्वेदिक औषधोपचार करण्यास परवानगी दिली आहे. 

covid19 patients count in navi mumbai crosses mark of 2000 cases


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid19 patients count in navi mumbai crosses mark of 2000 cases